Theft : पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी

Theft : पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी

0
Theft

Theft : श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात (Shri Sudrikeshwar Maharaj Temple) अज्ञात चोरट्यांनी (Thief) देवाचे सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन चोरुन (Theft) नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

नक्की वाचा: आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक

५० किलो चांदीच्या सिंहासनाची चोरी (Theft)


पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरामध्ये सोमवारी (दि.१२) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा कटवणीच्या सहाय्याने तोडून मंदिरात प्रवेश करत मंदिरातील सुद्रिकेश्वर महाराजांचे सुमारे ३० लाखांचे ५० किलो चांदीचे सिंहासन नेले.
श्रीगोंदा येथील व्यापारी कुटुंबासह दर्शनासाठी आले असताना त्यांना दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी मंदिराचे पुजारी प्रवीण रमेश धुमाळ यांना घडलेल्या घटनेची माहिती फोन करून दिली. पुजारी धुमाळ यांनी मंदिराकडे धाव घेत मंदिरात जाऊन पाहिल्यावर मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिसांना समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिरात धाव घेत पाहणी करत वरिष्ठांना घटनेची माहिती कळवत पुढील तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने परिसरातच माग दाखविला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पुढील तपासकामी सूचना दिल्या.

हे देखील वाचा: शेतकऱ्यांचं आंदोलन 2.0 उद्या दिल्लीत धडकणार

पोलिसांकडून तपास सुरु (Theft)


घटनास्थळी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांनी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केला.


चोरीचे चित्रीकरण मंदिरात असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून श्रीगोंदा पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासात तांत्रिक माहिती संकलन करत तपास सुरू केला आहे.


श्री सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात चोरी झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी करत गावबंद ठेवत निषेध सभा घेतली. या सभेमध्ये ग्रामस्थांनी चोरट्यांचा शोध तत्काळ घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here