Tree planting : राहुरी : देसवंडी येथे लोकनियुक्त सरपंच (Sarpanch) योगिता नितीन कल्हापूरे यांच्या संकल्पनेतून महत्वपूर्ण निर्णय (important decision) घेतला आहे. गावात सुमारे एक हजार नारळाच्या झाडांची लागवड (Tree planting) करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक
आदर्श गाव बनवण्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट (Tree planting)
देसवंडी हे साधारण २५०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात नदी असल्याने नेहमी वाळुच्या कारणाने किरकोळ वादावादी होत असे. कोणत्या ना कोणत्या कारणाने गाव चर्चेत असते. परंतु विकासाच्या दृष्टीने गाव तसे मागासलेले राहिले, अशी अनेक सुज्ञ नागरिकांची खंत होती.
अवश्य वाचा : शाळाबाह्य २६ मुले शिक्षणाच्या प्रवाहात दाखल
गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये म्हणजेच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत नितीन कल्हापूरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील वेगवेगळ्या पक्षाचे नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याने ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच योगिता कल्हापूरे व एकविचाराने एकत्र आलेले सर्व सदस्यांना निवडून दिले. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने विकासाचा संकल्प केला. त्याचीच सुरुवात म्हणून आदर्श गावाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी आणि आदर्श गाव बनवण्यासाठी गावात सुमारे १००० नारळाचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ग्रामसभेतून गावाला वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देऊन एक आगळावेगळा उपक्रम मांडला आणि गावकऱ्यांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले.
नक्की वाचा: दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा ;बुमराह-अश्विनचा भेदक मारा
वाढदिवस एक झाड देऊन साजरा (Tree planting)
प्रत्येकाने आपला वाढदिवस एक झाड देऊन साजरा करावा तसेच ज्या घरामध्ये कोणी व्यक्ती दिवंगत झाली असेल त्यांच्या स्मरणार्थ झाडे दान करावे, असे ठरविण्यात आले. या पद्धतीने सुमारे १००० झाडाची संकल्पना देसवंडी गावातील सर्व गावकरी पूर्ण करणार आहेत. याप्रसंगी नितीन कल्हापूरे, प्रकाश प्रभाकर शिरसाठ, वसंत पर्वत शिरसाठ, लक्ष्मण गोपीनाथ शिरसाठ, मंगेश जगधने,अक्षय कल्हापुरे, संतोष शिरसाठ, संदीप सोपान शिरसाठ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.