Cricket : नगरच्या स्वप्नील मुंगेलची भारताच्या क्रिकेट संघात निवड

Cricket : नगरच्या स्वप्नील मुंगेलची भारताच्या क्रिकेट संघात निवड

0
Cricket

Cricket : नगर : बीसीसीआयचे (BCCI) सहकार्य असलेल्या भारताच्या दिव्यांग खेळाडूंच्या क्रिकेट (Cricket) संघात नगरच्या स्वप्नील मुंगेल (Swapnil Mungel) याची निवड झाली आहे. दिव्यांगांच्या भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) निवड झालेला स्वप्नील हा नगरमधील पहिला खेळाडू ठरला आहे.

Cricket

नक्की वाचा: दुसऱ्या कसोटीत भारताने उडवला इंग्लंडचा धुव्वा ;बुमराह-अश्विनचा भेदक मारा

भारत व इंग्लंड यांच्यात दिव्यांगांचा क्रिकेट मालिका सुरू (Cricket)


स्वप्नील हा डावखुरा फलंदाज व डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये भारत व इंग्लंड यांच्यात दिव्यांगांचा क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेत पाच टी-२० सामने खेळविले जात आहेत.

हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

आशिया कप व सुपर सिक्स मालिकेत भारतीय संघातून खेळणार (Cricket)

त्यातील तीन सामने जिंकत भारताने मालिका जिंकली आहे. इंग्लंडने एक सामना जिंकला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना उद्या (ता. ६) होणार आहे. या मालिकेनंतर तो आशिया कप व सुपर सिक्स मालिकेत भारतीय संघातून खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here