Prohibition : कर्जत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

Prohibition : कर्जत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा

0
Prohibition

Prohibition : कर्जत : आशा वर्कर (Asha Workers) आणि गट प्रवर्तक यांचे मागील तीन महिन्याचे स्टेट फंड व मानधन तात्काळ मिळावे, या मागणीसाठी कर्जतच्या महिला कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर निषेध (Prohibition) मोर्चा काढत निवेदन दिले. यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत राज्य सरकारच्या (State Govt) विरोधात घोषणाबाजी केली.

नक्की वाचा: मराठा आरक्षणाविराेधातील पाेस्ट तातडीने थांबवा; अन्यथा मनाेज जरांगेंचा कडक शब्दात इशारा

मानधन वेळेवर मिळत नाही (Prohibition)


कर्जत पंचायत समितीच्या आरोग्य विभागात मानधनावर काम करत असलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी घरोघरी जात प्रामाणिकपणे आरोग्यबाबत माहिती आणि जनजागृतीचे काम केले आहे. यासह कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता काम केले आहे. तरी देखील आमचे मानधन वेळेवर मिळत नाही. याबाबत सरकार कायम वेळकाढूपणा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. याच अनुषंगाने राज्यात सर्वत्र १२ जानेवारीपासून आशा वर्कर आणि गट प्रवर्तक यांचे विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. या काळातील स्टेट फंड आणि मानधन आरोग्य विभागाच्या खात्यावर जमा झाले असून ते आजमितीस मिळाले नसून आमच्या कुटुंबाचे उदर-निर्वाह कसे करावे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

हे देखील वाचा: छगन भुजबळांनी माफी मागावी; ‘त्या’ वक्तव्यावरून नाभिक समाज आक्रमक

फंड आणि मानधन तात्काळ मिळण्याची मागणी (Prohibition)

त्यामुळे आमचे ३ महिन्याचे फंड आणि मानधन तात्काळ आम्हाला मिळावे, या मागणीसाठी जिल्हा कार्यकारिणी सदस्या नाझीया पठाण आणि तालुकाध्यक्षा लंका पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील आशा आणि गट प्रवर्तक यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माधुरी गोहेर, माधुरी भगत, सुनीता गोडसे, दीपाली मुरकुटे, अनुराधा थोरात, रेहाना शेख, वंदना बिटके, मनीषा खराडे, सारिका शिंदे, इर्शाद बेग, इंदुमती चव्हाण, वैशाली त्रिभुवन, स्वाती जवणे, मोनाली धांडे, वर्षा गावडे, संध्या लोंढे आदी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here