Vasant Hankare : नगर : आई-वडिलांची (Parents) कदर करा. वेळ निघून केल्यावर उपयोग होत नाही. ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा संभाळ केला त्या मुली दोन दिवसांच्या प्रेमा खातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. अनाथांकडून (Orphan) जाणून घ्या आई-वडिलांची किंमत काय असते, असे प्रतिपादन युवा व्याख्याते व प्रबोधनकार वसंत हंकारे (Vasant Hankare) यांनी केले.
हे देखील वाचा: पारगाव येथील सुद्रिकेश्वर महाराज मंदिरात जबरी चोरी
ऐतिहासिक उदाहरणे देऊन प्रबोधन (Vasant Hankare)
युवा एकसाथ फाउंडेशनने शुक्रवारी (ता. ९) युवा परिवर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी आयोजित व्याख्यानात त्यांनी हे मत व्यक्त केले. व्याख्यानात त्यांनी विविध सामाजिक व ऐतिहासिक उदाहरणे देऊन आई-वडिलांचे महत्त्व, सोशल मीडियाचा सदुपयोग कसा करावा, मोबाईलचा दुरुपयोग कसा टाळावा, या संदर्भात प्रबोधन केले. त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित तरुण-तरुणी भावूक झाले.
नक्की वाचा: आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक; ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंदची हाक
यांची उपस्थिती (Vasant Hankare)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रोहित काळोखे, उपाध्यक्ष संदेश कानडे, ओंकार पागावाड, महेश साठे, चंद्रकांत काळोखे, नितीन साठे, प्रदीप वाघचौरे, राज जाधव, सुमित भिंगारदिवे, प्रिया धायतडक, किरण पालवे, प्रिती क्षेत्रे, प्रशांत कनगरे, यश शेकटकर, प्रतेश मोहिते, हेरी वाघमारे, हर्षय शिरसाठ, श्रेया कसबेकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी रक्तदान शिबिर व दिव्यांग बांधवांना व्हिलचेर वाटप कार्यक्रमही झाला. नृत्यांगणा इरा पालवेने देशभक्तीपर गीते सादर केली. उद्धव काळापहाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. साईराज चव्हाण यांनी आभार मानले.