Voting : मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’चा खाेळंबा; भाजपचंच षडयंत्र असल्याचा संजय राऊतांचा गंभीर आराेप

Voting : मतदान केंद्रांवर 'ईव्हीएम'चा खाेळंबा; भाजपचंच षडयंत्र असल्याचा संजय राऊतांचा गंभीर आराेप

0
Voting
Voting : मतदान केंद्रांवर 'ईव्हीएम'चा खाेळंबा; भाजपचंच षडयंत्र असल्याचा संजय राऊतांचा गंभीर आराेप

Voting : नगर : लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या मतदान (Voting) प्रक्रियेत ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांचा (Voter) खोळंबा होतोय. काही मतदार कंटाळून मतदानाकडे पाठ फिरवत असल्याचं निदर्शनास आले. मतदारांना पाठ फिरवायला लावणं हा भाजपच्या (BJP) षडयंत्राचा भाग असू शकतो, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आराेप केला आहे.

हे देखील वाचा: देशाच्या भल्यासाठी या सरकारने काहीच केलेले नाही : शरद पवार

८८ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, केरळसह १३ राज्यातील ८८ जागांसाठी मतदान होत आहे. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन बंद पडले असून मतदानासाठी अडथळा निर्माण झाला आहे. बंद पडलेल्या ईव्हीएम मशिन संध्याकाळनंतर सुरु होतात. त्यानंतर ज्यांना हवे आहे, त्या लोकांच्या झुंडी तिथे उभ्या राहतात. सकाळी येणाऱ्या मतदारांना निराश करणे, हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपाचे षड्यंत्र असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नक्की वाचा : तब्बल एक तपानंतर चोरीला गेलेले दागिने मिळाले; शिक्षिकेच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले

राऊत म्हणाले (Voting)

” राज्यात आठ ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आधीच्या विदर्भातील निवडणुका आणि आजच्या निवडणुकांत महाविकास आघाडीचेच पारडे जड आहे. आम्ही लाेकसभा निवडणुकीत ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार आहोत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here