शेतकरी चिंतातूर : उत्तरेतील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा
Waiting for the Rain : नगर : जिल्ह्यातील उत्तरेतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Areas) पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे या भागातील धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उत्तरेतील भंडारदरा (Bhandardara), निळवंडे, आढळा, मुळा आदी धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्या तुलनेत दक्षिणेतील धरणांच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. या भागातील सीना, खैरी, घाटशिळ पारगाव, मांडओहोळच्या पाणलोटात अद्याप पावसाची प्रतीक्षा (Waiting for the Rain) आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतातूर आहेत.
उत्तरेतील धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस कमी
जिल्ह्यातील उत्तरेकडील भंडारदरा, मुळा, निळवंडे या महत्त्वाच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यातील भंडारदरा, निळवंडे या धरणांमध्ये 92 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रवरा नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा जवळपास 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच आढळा व इतरही छोटी धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. त्यामुळे उत्तरेतील धरणांच्या लाभक्षेत्रात पाऊस कमी असला तरी धरणे भरल्याने शेतकर्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्यांची खरीप व रब्बी हंगामातील पिके चांगल्या प्रकारे येतील.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा (Waiting for the Rain)
त्या तुलनेत दक्षिणेतील धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे दक्षिणेतील सीना, खैरी, मांडओहोळ, घाटशिळ पारगाव धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. सीना 30 टक्के, खैरी 17 टक्के, मांडओहोळ 17 टक्के असा पाणीसाठा आहे. विसापूर, घोड या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. या धरणांना कुकडी प्रकल्पातील ‘ओव्हरफ्लो’च्या पाण्याचा फायदा झाला आहे. तसेच त्या भागात पाऊसही चांगला झाला. त्यामुळे या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला आहे.
कुकडीच्या ‘ओव्हरफ्लो’तून गाव तलाव भरा…
कुकडीच्या ‘ओव्हरफ्लो’चे पाणी सध्या कालव्यातून सुरू आहे. त्यामुळे या पाण्यातून श्रीगोंदा, कर्जत, पारनेर तालुक्यातील गाव तलाव भरून द्यावीत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. या तीनही तालुक्यात मागील दोन्ही महिन्यात रिमझिम वगळता पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिके कशीबशी तग धरून आहेत. त्यामुळे गावतलाव, बंधार्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा….
भंडारदरा 10264 दलघफू (92 टक्के), निळवंडे 7709 दलघफू (92 टक्के), मुळा 18025 (69 टक्के), आढळा 1060 (100 टक्के), घोड 5861 (98 टक्के), मांडओहोळ 69.92 (17 टक्के), घाटशिळ पारगाव 66 (15 टक्के), सीना 725 (30 टक्के), खैरी 94.85 (17 टक्के), विसापूर 804 (88 टक्के), मुसळवाडी 45.44 (24 टक्के), टाकळीभान 63.76 (32 टक्के).



