Weather Update: देशात थंडी वाढली ; उत्तरेकडील राज्यांना ‘रेड’ व ‘ऑरेंज’ अलर्ट

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे किमान तापमान नऊ ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

0
Weather Update
Weather Update

नगर : महाराष्ट्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडी (The Cold) अधिक जाणवत आहे. उत्तरेकडील थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने वळाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमानाचा पारा दहा अंशापेक्षाही कमी आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान खात्याने (Meteorological Department of India) काही राज्यांमध्ये चक्क थंडी आणि धुक्याचा ‘ऑरेंज’ व ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.

नक्की वाचा : १ मार्चला होणार ‘लग्न कल्लोळ’; चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

थंडीमुळे तापमानात आणखी घट होणार (Weather Update)

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे किमान तापमान नऊ ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत उन्हाची चाहूल जाणवू लागली असतानाच आता बुधवार (ता. १८) पुन्हा आभाळी वातावरण आहे. त्यामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.

भारतीय हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ व ‘रेड अलर्ट’ जाहीर (Weather Update)

अवश्य वाचा : मोदींसमोर हात पसरवण्याची गरज नाही ;आम्ही लढून आरक्षण मिळवणार : जरांगे

उत्तरेकडील राज्यांमध्येही किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे या राज्यांसह देशातील अनेक भागांत आता थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील काही दिवसही थंडीची लाट कायम राहणार असून भारतीय हवामान खात्याने अनेक राज्यांना पावसाचा नाही तर थंडी आणि धुक्यांचा ‘ऑरेंज’ व ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे.

दरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशातील हवामानात येत्या काही दिवसांत बदल देखील पाहायला मिळू शकतात. मध्यप्रदेशात देखील किमान तापमानाचा पारा मंगळवारी ३.६ अंश सेल्सिअसवर पोहोचला. अनेक ठिकाणी ते चार ते पाच अंश सेल्सिअस सुद्धा नोंदवण्यात आले. अनेक  राज्यात सुद्धा धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here