Rahuri News: राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद

0
Rahuri News:राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद
Rahuri News:राहुरी नगरपरिषदेचा मोठा ठराव;दीड तास मोबाईलसह मनोरंजनांची माध्यमे राहणार बंद

Rahuri News: विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी, तसेच याबाबत पालकांना सतर्क करण्यासाठी राहुरी नगरपालिका (Rahuri Municipality)आता सायरन वाजवणार (Will sound The Siren) आहे. रोज किमान दीड तास मोबाईलसह सर्व मनोरंजनाची माध्यमे बंद (Mobile phone switched off for one and a half hours) ठेवावीत, यासाठी हा सायरन वाजवला जाणार आहे. राहुरी नगरपालिकेने तसा ठरावच केला आहे. नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे (Mayor Bhausaheb More) यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि ठराव करण्यात आला. 

नक्की वाचा: काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’;रुबल नागी नेमक्या कोण?

राहुरी नगर परिषदेत एकमताने ठराव मंजूर  (Rahuri News)

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांना व कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी तसेच कुटुंबातील आई, वडील, पत्नी व इतर नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी वेळ द्यायला हवा. या संकल्पनेतून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगरपरिषदेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. या ठरावानुसार,राहुरी पालिकेत सायंकाळी सात वाजता व साडेआठला एक भोंगा वाजेल. या दीड तासात मोबाईल, दूरदर्शन अशा माध्यमापासून शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी पूर्णपणे दूर रहावे, अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी व्यक्त केली.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी निर्णय  (Rahuri News)

आजच्या युगात मोबाईलचा अति वापर, टीव्ही, सोशल मीडिया व इतर व्यसनाच्या सवयी, यामुळे आपली तरुण पिढी बऱ्याच प्रमाणात भरकटलेली आपण पाहतो. पालक व मुलांमध्ये संवाद राहिला नाही. लहान मुलानां चांगल- वाईट यातील फरक सांगायला व त्यांच्यापाशी बसायला कोणालाही वेळ नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार स्वतः पालक आहेत. पालक म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कि, आपल्याकडून या सवयींना वेळीच आवर घातला पाहिजे. याकरीता राहुरीतील नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून राहुरी नगरपरिषदेच्या सभेत एकमताने हा विषय मंजूर करण्यात आला. 

त्यामध्ये सायंकाळी ७ वाजता नगरपरिषदेचा सायरन वाजल्यानंतर सर्व पालकांनी आपल्या घरातील टिव्ही व इतर मनोरंजनाचे माध्यम बंद करायचे असं सांगण्यात आले आहे. यानंतर मुलांना आपल्या घरातच अभ्यासासाठी बसवायचं आहे. आपण स्वतः घरात थांबुन पुस्तकाचे वाचन करणे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे कुटुंबाला वेळ दिल्यानंतर तब्बल दीड तासानंतर रात्री ठीक ८.३० वाजता दुसरा सायरन वाजेल आणि त्यानंतर पालकांनी आपल्या कामाला वेळ दिला तरी चालेल,असाच ठराव यावेळी राहुरीत करण्यात आला आहे. तो एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच यासाठी पूर्वसूचना सायरन वाजवून दिली जाणार आहे.

आज हा निर्णय कठोर वाटत असला तरी पुढच्या पिढीला घडविण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर आली आहे.तरी सर्व पालक वर्ग या गोष्टीचा काटेकोर अवलंब करतील व पालिकेच्या निर्णयाला पाठिंबा देतील,अशी अपेक्षा नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे तसेच सर्व नगरसेवक व नगरपरिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.