Election: कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव 

Election: कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव

0
Election: कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव
Election: कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा धक्कादायक पराभव

Nirmala Navale defeat in election: राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती (Panchayat Samiti) साठी निवडणुक (Election) प्रक्रिया पार पडली. यामध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश आहे. कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी त्यांच्याविरोधात उमेदवारी केली होती. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. मनीषा पाचंगे यांनी या गणातून विजय मिळवला आहे. मनीषा यांनी निर्मला नवले यांचा 300 मतांनी पराभव केला आहे.

सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) निर्मला नवले यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे तब्बल सव्वा पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांनी शेअर केलेले व्हिडीओ आणि पोस्ट्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

नक्की वाचा: काश्मिरी कन्येला मिळाला शिक्षण क्षेत्रातील ‘नोबेल’;रुबल नागी नेमक्या कोण?

कारेगावच्या सरपंच असलेल्या निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रियपणे कार्यरत आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच निवडणूक प्रचारात त्यांनी आघाडी घेतली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत अजित पवारांनी त्यांच्यावर वर्किंग प्रेसिडेंट एनसीपी युवती महाराष्ट्र या पदाची जबाबदारीही सोपवली होती.

पुढील संधी मिळणार का? (Election)

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या निर्मला नवले या सुशिक्षित आणि प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. मात्र, या पराभवानंतर आता आगामी काळात राष्ट्रवादीकडून त्यांना पुढील संधी मिळणार का, आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्या उमेदवारीबाबत काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.