Thanya Nathan:डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

0
Thanya Nathan:डोळ्यांनी अंध असली तरी 'ती' देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?
Thanya Nathan:डोळ्यांनी अंध असली तरी 'ती' देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?

Thanya Nathan : ज्या डोळ्यांनी कधी जग पाहिलं नाही, आज तिच्या कर्तृत्वाने जग वेडं झालंय. डोळे नसले तरी तिच्यातला आत्मविश्वास कधी डगमगला नाही. आणि हाच आत्मविश्वास तिची ढाल बनला आणि ती झाली देशातील पहिली महिला अंध न्यायाधीश, हि गोष्ट आहे केरळच्या पहिल्या महिला अंध न्यायाधीश (Kerala’s first blind woman judge) थान्या नाथन (Thanya Nathan) यांची. जन्मजात अंधत्व असूनही, २४ वर्षाच्या थान्या यांनीअवश्य वाचा,त घवघवीत यश संपादन केलय, त्या केरळच्या पहिल्या १००% दृष्टिहीन महिला जज बनल्या आहेत. त्यांच्या या यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र थान्या नाथन नेमक्या आहेत कोण ? हेच आज जाणून घेऊ… 

नक्की वाचा: उन्हाळ्याची चाहूल लागताच पुण्यात पावसाच्या सरी बरसणार;काय सांगतो हवामान विभागाचा अंदाज ? 

थान्या नेमक्या कोण आहेत ? (Thanya Nathan)

कन्नूर जिल्ह्यातील तालिपरम्बा येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय थान्या यांनी लहानपणापासूनच अनेक आव्हानांचा सामना केला. सुरुवातीचे शिक्षण विशेष शाळेत झाल्यानंतर, त्यांनी १० वी आणि १२ वीचे शिक्षण सामान्य शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर कन्नूर विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. विशेष म्हणजे, संपूर्ण लॉ कॉलेजमध्ये त्या एकमेव दृष्टिहीन विद्यार्थिनी होत्या, तरीही त्यांनी अभ्यासात नेहमीच आपलं अव्वल स्थान टिकवून ठेवले. जन्मानेच मिळालेलं अंधत्व पदरात असतानाही त्यांनी ब्रेल लिपी, स्क्रीन रीडिंग तंत्रज्ञान आणि अढळ संकल्पाच्या जोरावर आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचं हे यश केवळ वैयक्तिक मेहनतीचे उदाहरण नसून न्यायक्षेत्रातील सर्वसमावेशकतेचं प्रतीक ठरलंय.

अवश्य वाचा: “दादा,आता त्या विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण कायम राहील”;अमोल मिटकरींचं अजित दादांना व्हॅलेंटाईन निमित्त भावनिक पत्र

सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे थान्या यांचं स्वप्न पूर्ण  (Thanya Nathan)

२०२५ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे थान्या यांचं न्यायाधीश बनण्याचे स्वप्न शक्य झाले. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं होतं की, “दृष्टिहीन उमेदवारांना न्यायिक सेवेसाठी ‘अपात्र’ मानलं जाऊ शकत नाही आणि ते या पदांच्या निवडीत सहभागी होण्यास पूर्णपणे पात्र आहेत. केवळ अपंगत्वाच्या कारणास्तव कोणत्याही उमेदवाराला संधी नाकारता येणार नाही. या निर्णयामुळे थान्या यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तींसाठी न्यायपालिकेची दारं उघडली गेली.

डोळ्यांनी पाहता येत नसले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने थान्या यांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात केले. आपल्या यशाचे गमक सांगताना त्या म्हणतात, स्क्रीन-रीडर सॉफ्टवेअरद्वारे त्यांनी कायदेशीर कागदपत्रे आणि पुस्तकांचे वाचन केले. महत्त्वाच्या कलमांचा आणि केस स्टडीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ब्रेल लिपी आणि ऑडिओ नोट्स या माध्यमांचा वापर केला. त्यांनी काही काळ तालिपरम्बा येथे वकिलीची प्रॅक्टिस केली, ज्यामुळे त्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. थान्या नाथन यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. कारण दिवाणी न्यायाधीश म्हणजेच (Civil Judge) परीक्षेत त्यांनी दिव्यांग श्रेणीतून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

थान्या या भारतातील दुसऱ्या १००% दृष्टिहीन न्यायाधीश ठरल्या आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे देशातील पहिले पूर्णतः दृष्टिहीन न्यायाधीश बनले होते. जागतिक स्तरावर, १९९१ मध्ये युनायटेड किंगडममध्ये सर जॉन अँथनी वॉल हे जगातील पहिले १००% अंध न्यायाधीश बनले होते. न्याय हा आंधळा नसावा, तर सर्वसमावेशक असावा, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे थान्या यांचा हा प्रवास केवळ केरळसाठीच नव्हे, तर देशभरातील लाखो दिव्यांग तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.