
Radhakrishna Vikhe Patil : शेवगाव : बेलापूर -श्रीरामपूर -परळी या रेल्वे मार्गाच्या (Belapur -Shrirampur – Parli Railway Line) मंजुरीसाठी कुकाणा (ता.नेवासा) येथे ९ फेब्रुवारी पासून उपोषण चालू आहे. आज (ता. १७) उपोषणाला ९ दिवस झाले आहे. सकाळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील (Vitthalrao Langhe Patil) यांच्या मध्यस्थीने अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दूरध्वनीवरून उपोषणकर्ते यांच्याशी संवाद केला.
नक्की वाचा : युनुस सय्यद यांच्या ‘इनुची गोष्ट’ला राज्य शासनाचा सर्वोच्च वाङ्मय पुरस्कार जाहीर

तोडगा काढण्याचे आश्वासन
आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उपोषण स्थळी भेट दिली होती प्रसंगी त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी या विषयावर गंभीर्याने चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. आमदार लंघे यांनी आज (ता. १७) मुंबई येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली तसेच उपोषणकर्ते यांच्याशी पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी मध्यस्थी करत दूरध्वनी वरून संवाद साधला. पालकमंत्री विखे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली.
अवश्य वाचा : माळीवाडा बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर
मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही (Radhakrishna Vikhe Patil)
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बरोबर लवकरच या रेल्वे मार्गाबाबत बैठक घेऊन विषय मांडण्याचे आश्वासन दिले आहे. पालकमंत्री यांनी उपोषण सोडण्यासाठी विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते यांनी मंजुरीचे पत्र मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे ठाम सांगितले. १०४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रेल्वे मार्गाचे मंजुरी मिळवण्यासाठी कितपत यशस्वी होतात याकडे या मार्गावरील जनतेचे लक्ष लागले आहे.


