Damage to crops | अकोले: तालुक्यातील भंडारदरा अभयारण्य व क्षेत्रालगतच्या गावांमध्ये वन्यजीवांकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage to crops) होत आहे. मुतखेल, रतनवाडी, घाटघर आदी भागातील शेतकप्यांच्या भुईमूग, भाजीपाला, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांचे रानडुक्कर, हरिण, गवा, माकड, बानर याच्याकडून रातोरात नुकसान होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
अवश्य वाचा- माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल
तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी (Damage to crops)
याबाचत सामाजिक कार्यकर्ते अनंत घाणे, बाजार समितीचे संचालक तुकाराम खाडे, सखाराम उंबरे, बुधा इदे, अमृता झडे, बाजीराव सगभोर, हनुमंता बुळे, योगेश खाडे, सुभाष बांडे, तुकाराम सारुक्ते, किसन आंबवणे आदिंसह परिसरातील शेतकऱ्यांनी भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गावित यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
नक्की वाचा- सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ठोस उपाययोजना करण्याची मागणी (Damage to crops)
या बैठकीत शेतकऱ्यांच्या शेती संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. याचबरोबर अभयारण्यात व लगतच्या क्षेत्रात आंबा, चिंच, पिंपळ, आवळकंठी, वड, उंबर आदी फळझाडे मोठ्या प्रमाणात लावून वन्यप्राण्यांसाठी नैसर्गिक खाद्य उपलब्ध करून द्यावे, तसेच नैसर्गिक व कृत्रिम पाणवठे तयार करावेत, अशी सूचना केली. पर्यटकांकडून होणारा प्लास्टिक व इतर कचरा टाळण्यासाठी जागोजागी कचराकुंड्या बसवाव्यात, प्लास्टिक विरोधी गावोगावी जनजागृती मोहीम राबवावी आणि जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. त्यावर मागण्यांची दखल घेत लवकरच पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.



