Education Department : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला ‘वेठबिगारी’;  शिक्षण विभागाचा छळ

Education Department : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला 'वेठबिगारी'; शिक्षण विभागाचा छळ

0
Education Department : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला 'वेठबिगारी'; शिक्षण विभागाचा छळ
Education Department : श्रीगोंद्यातील शिक्षकांच्या वाट्याला 'वेठबिगारी'; शिक्षण विभागाचा छळ

Education Department : श्रीगोंदा : ज्या समाजात शिक्षकांना (Schools Teachers) ‘राष्ट्रनिर्माते’ मानले जाते, त्याच समाजात त्यांच्या वाट्याला ‘वेठबिगारी (Wage Labour)‘ येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेने शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट पलरली आहे. ‘मिशन आरंभ (Mission Aarambh)‘ या शैक्षणिक उपक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे ओझे शिक्षकांच्या खांद्यावर देऊन प्रशासनाने चक्क त्यांना ‘हमाल’ म्हणून राबवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नक्की वाचा : राहाता तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी

शिक्षकांनाच टेम्पोमधील गठ्ठे उतरवण्यास सांगीतले

बुधवार (ता. १८)  शाळा सुटल्यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतर शिक्षकांना पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पाचारण करण्यात आले होते. ‘मिशन आरंभ’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या परीक्षेचे पेपर कार्यालयात पोहोचले होते. मात्र, हे पेपर उतरवण्यासाठी हमालांची व्यवस्था करण्याऐवजी, तिथे उपस्थित असलेल्या शिक्षकांनाच टेम्पोमधील जड गठ्ठे उतरवण्यास आणि ते वाहून नेण्यास सांगण्यात आले.

अवश्य वाचा : मिरजगावात गांजासह दोघे जेरबंद; २५ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्षक संघटनांचा संतप्त सवाल (Education Department)

शासकीय नियमांनुसार, कोणत्याही शैक्षणिक साहित्याची वाहतूक, चढ-उतार आणि वितरणासाठी स्वतंत्र ‘आर्थिक तरतूद’ केलेली असते. यामध्ये हमालीच्या खर्चाचाही समावेश असतो. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, जर हमालीसाठी पैसे मंजूर आहेत, तर तो पैसा गेला कुठे? हमालांऐवजी शिक्षकांकडून हे काम करून घेऊन कुणाचे खिसे भरले जात आहेत? असा संतप्त सवाल आता शिक्षक संघटना विचारत आहेत.

हे देखील वाचा : १० महिन्यांची चिमुकली ५ जणांना जीवनदान देऊन गेली! 

अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा

शिक्षकांवर आधीच अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा आहे. निवडणुका, जनगणना, विविध प्रकारचे सर्व्हे आणि ऑनलाईन माहिती भरण्यातच शिक्षकांचा बराच वेळ जातो. त्यात आता ‘हमाली’ सारखी कामेही त्यांच्या माथी मारली जात असल्याने “शिक्षकांनी नक्की शिकवायचे कधी?” असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुणवत्तेचा दर्जा घसरला की शिक्षकांना दोष देणारे प्रशासन स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

शिक्षण विभागाच्या प्रतिमेला तडा

या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षण विभागाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आणि गटविकास अधिकारी राणी फराटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. ज्यांनी शिक्षकांकडून ही वेठबिगारी करून घेतली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. श्रीगोंद्यातील हा प्रकार म्हणजे केवळ एका तालुक्याची बातमी नसून, ही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘वाळवी’ आहे. शिक्षकांच्या स्वाभिमानाची ही होणारी पायमल्ली भविष्यातील पिढीसाठी घातक ठरणारी आहे.