Chhatrapati Shivaji Maharaj | नगर : शंभर वर्षापूर्वीचे आपले पूर्वज कोण आहेत हे आपल्याला आठवत नाही, सांगता येत नाही तर ३५० वर्षांपूर्वीचा राजांचा इतिहास आपल्याला आठवतो. आपण राजांचे विचार समजून घेतले पाहिजे. खूप राजे होऊन गेले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा (Chhatrapati Shivaji Maharaj) राजा होणे नाही. जातीच्या पलीकडे जाऊन राजांने राज्य उभे केले, असे प्रतिपादन व्याख्याते न्यू आर्ट्स कॉलेजचे प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.
हे वाचा – अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव; माझी वसुंधरा अभियानात पटकावला राज्यात दुसरा क्रमांक
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी (Chhatrapati Shivaji Maharaj)
अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथील शिशू संगोपन संस्था संचालित सविता रमेश फिरोदिया प्रशाला, श्रीकांत पेमराज गुगळे हारस्कूल, महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव रं. धो. कासवा, संस्थेचे विश्वस्त राजेंद्र चोपडा, विनोदकुमार कटारिया, कांचन गावडे, प्राचार्य दत्तात्रय कसबे, मुख्याध्यापिका योगिता गांधी, पर्यवेक्षक प्रा. संजय शेवाळे यांच्यासह प्रशाला, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारीवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवश्य वाचा – डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षित (Chhatrapati Shivaji Maharaj)
डॉ. सय्यद म्हणाले की, ज्याने महिलांवर अत्याचार केला त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंग केला. राजांच्या रयतेत, काळात महिला सुरक्षित होत्या, कोणी अन्याय, अत्याचार केला तर त्याला माफी नाही, सामान्यांचे भल व्हावे म्हणून राजानं तह केला होता. शत्रू समुद्राच्या मार्गाने येईल म्हणून राजांनी ३५० वर्षांपूर्वी आरमार उभे केले. अधिकृतपणे गुलामगिरी बंद करणारा राजा छत्रपतीच होते, पन्हाळा गडाला वेढा घातलेला प्रसंग तसेच राजांचा इतिहास त्यांनी सांगितला. यावेळी संस्थेचे खोसे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत त्यांचे मंदिर बनवा असे काहींचे मत आहे.छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते तर ते महापुरुष आहे असे परखड मत व्यक्त करत त्यांनी राजांचा इतिहास थोडक्यात मांडला. गेल्या सात तेे आठव्या दशकापासून संस्कृती घेवून पुढे मराठी भाषिकांचे राज्य छत्रपतींनी उभे केले.
हे पहा – आर्थिक गुंतवणुकीचा सर्वात फायदेशीर फॉर्म्युला कोणता?
मराठी माणूस असे पर्यंत मराठी भाषा जीवंत (Chhatrapati Shivaji Maharaj)
मराठी भाषिक जोपर्यंत राहील तोपर्यंत मराठी भाषा जीवंत राहील. त्यामुळे राज्य शासनाने देखिल मराठी भाषेला अभिराज्य भाषेचा दर्जा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुंदेचा यांनी शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून प्रेरणा घेवून पुढे जायचे आहे त्यामुळे राजांचा आर्दश डोळ्यासमोर ठेवा असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी केले. श्रद्धा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी साक्षी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गीत सादर केले.



