Radhakrishna Vikhe Patil : श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने (Water Resources Department) अतिक्रमण काढण्याबाबत नोटीसा (Notice) बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. मंत्री विखे पाटील यांनी देखील या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही,असे आश्वासनही दिले आहे.
नक्की वाचा: सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
निवेदनात म्हटले आहे की
निवेदनावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगर परिषद हद्दीत जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये सुमारे 30 ते 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत तसेच छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात दिलेल्या नोटीशी मुळे त नागरिक भयभीत झाले आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
सदर नागरिक हातावर काम करणारे (Radhakrishna Vikhe Patil)
सदर नागरिक हातावर काम करणारे आहे. अतिक्रमण काढल्यास त्यांचे संसार उघड्यावर येणार आहेत. सध्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत त्यामुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थी देखील घाबरले आहेत. नगर विकास विभागाच्या 2019 च्या शासन निर्णयानुसार सदर रहिवाशी प्रयोजनासाठी श्रीरामपूर येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर असलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आपण आपल्या स्तरावर तातडीने बैठक घ्यावी व सध्या दिलेल्या नोटिशींना स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी केली आहे. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासनही दिले आहे.



