Umed : श्रीगोंदा : “दुःख विसरून स्वतःच्या पायावर उभे राहा,” असा संदेश देत श्रीगोंदा तालुक्यातील २५० एकल महिलांनी (Single Women) रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याचा संकल्प केला. साऊ एकल महिला समिती, पंचायत समिती (Panchayat Committee) (उमेद), जगदंब फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Umed) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उद्योजकता विकास मेळावा व आरोग्य शिबिरात’ हा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नक्की पहा : महिलांच्या 70 टक्के समस्या संपतील; फक्त ‘या’ 4 गोष्टी फॉलो करा

शासकीय योजना व बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
उमेद’ बचत गट हेच रोजगाराचे उत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट करत शेती व बिगर शेती उद्योगांचे मार्गदर्शन केले. कायदेविषयक मदतीचे आश्वासन साऊ समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी बोलताना दिले. शासकीय योजना व बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. एकल महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास गट विकास अधिकारी श्रीमती राणी फराटे यांनी दिले. विधवा पेंशन, संजय गांधी निराधार योजना व रेशन कार्डावरील नोंदींबाबत तहसील विभाग सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही तहसीलदार सचिन डोंगरे यांनी दिली.
हेही वाचा : खटल्यास विलंब; पाथर्डी तुरुंगाधिकारी व पोलिसांच्या चौकशीचे न्यायालयाने दिले आदेश
पोषक डाळींच्या कीटचे वाटप (Umed)
यावेळी उमेद चे तालुका व्यवस्थापक राहुल अडागळे व राहुल साळवे यांनी बँक कर्ज व बचत गटाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी महिलांना त्यांच्या आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी साऊ समितीमार्फत २५० महिलांना पोषक डाळींच्या कीटचे वाटप करण्यात आले.या सोहळ्याला शुभांगी झेंडे, विकास पाटील, मोहन कांडेकर, राम घोडके, विस्तार अधिकारी वाघ, तसेच प्रभाग समन्वयक संदीप गाढवे, कृष्णा सरगर, दत्ता राखुंडे आणि ऋषिकेश रंधवे यांची प्रमुख उपस्थिती होती



