Fake fertilizer | बोगस खत विक्री करणाऱ्यांवर महिनाभरात तिसरा गुन्हा दाखल

0

Fake fertilizer | कोपरगाव : कोपरगाव (Kopargoan) तालुक्यातील विविध कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खत (Fake fertilizer) विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यानंतर कृषी विभागाने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांची बोगस खत विक्री करून फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. 

हे वाचा – अहिल्यानगर महानगरपालिकेकडून १४ मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सवलत

गुन्हे दाखल (Fake fertilizer)

महिना भराच्या कालावधीत तब्बल तीन ठिकाणी कारवाई करत संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांसह संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आणि गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे व कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. आतापर्यंत एकूण तिन्ही कारवायातील बोगस खत असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कंपन्यांची नावे जाहीर केली आहे.

अवश्य वाचा – लोणी-प्रवरानगर येथे २८ फेब्रुवारी पासून ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ चे आयोजन

बोगस खताचा साठा (Fake fertilizer)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथे बोगस खताचा साठा असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने धाड टाकत संशयित खताचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या अहवालात हे खत बनावट असल्याचे समजले. त्यानंतर गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली. देर्डे कोऱ्हाळे येथील आरोपी कृषी सेवा केंद्र चालक मयूर बाळू शिलेदार आणि इतर तीन कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे पहा – बायकोला न विचारता दारु प्याल तर जेलमध्ये जाल…

कृषी विभागाच्या कारवाईचे स्वागत (Fake fertilizer)

कृषी विभागाच्या या कारवायांमुळे बोगस खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी मात्र कृषी विभागाच्या कारवाईचे स्वागत केले आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत. यावेळी कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, शेतकरी बांधवांनी आपले कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. कुठे काही शंका आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. या संदर्भात माहिती गुण नियंत्रण निरीक्षक गणेश बीरदवडे आणि कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here