T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

0
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

T20 World Cup : नगर : टी-२० विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) सुरू झाल्यापासून भारतीय संघाने त्यांच्या क्षमतेला साजेसा खेळ केला नाही. भारताने (India) साखळी स्पर्धेतील सर्व सामने आरामात जिंकले असले तरी, कमी ताकदीच्या संघांनी भारताला चांगली लढत दिली होती. काळजी करण्यासारखे काही नाही हेच व्यवस्थापनाकडून (Management) नेहमीप्रमाणे सांगण्यात येत होते.

नक्की वाचा : अजित पवारांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करा; रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी
T20 World Cup : झिम्बाब्वेविरुद्ध ‘करो या मरो’ लढत”; सुपर-८मध्ये भारताची कसोटी

विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही

त्याला कारण होते की सर्वोत्तम खेळ होत नसूनही हाती लागलेले चार विजय. जेव्हा सुपर-८ फेरी चालू झाली आणि दक्षिण आफ्रिकेने भारताचा मोठा पराभव केला, तेव्हा खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाला जाग आली. आता उरलेल्या दोन सुपर-८ सामन्यांत भारताला विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही, हे सगळ्यांना कळून चुकले आहे.

अवश्य वाचा : ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू

सिकंदर रझाने झिम्बाब्वे संघामध्ये भरला आत्मविश्वास (T20 World Cup)

भारत वि. झिम्बाब्वे लढती अगोदर कागदावर भारतीय संघ जास्त मजबूत दिसत असला तरीही हे सत्य विसरून चालणार नाही की झिम्बाब्वे संघाने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका दोन संघांना पराभवाचा झटका देत सुपर-८ फेरी गाठून दाखवली आहे. कॅप्टन सिकंदर रझाने झिम्बाब्वे संघामध्ये आत्मविश्वास भरला आहे. तो नेतृत्वाबरोबर फलंदाजीत चमक दाखवत आहे. २२ वर्षीय ब्रायन बेनेट फलंदाजीत आक्रमकता राखून आहे. झिम्बाब्वे संघाच्या गोलंदाजांनी फलंदाजांबरोबरीने छाप सोडली आहे.

हे देखील वाचा : ‘फुला’तून उलगडणार मुरळीची संघर्षमय कथा!!

सर्वोत्तम खेळ करावा लागणार

ब्लेसिंग मझरबानीही झिम्बाब्वे संघासाठी अपेक्षित कामगिरी करत आहे. सुरुवातीच्या काही षटकात नवीन चेंडूवर फलंदाजाला बाद करायची कला त्याला अवगत आहे. साथीला रिचर्ड नगारवा आणि अनुभवी क्रीमर गोलंदाजी मजबूत करत आले आहेत. भारताला झिम्बाब्वेला धक्का द्यायला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. विजयी आत्मविश्वास परत आणायला क्षमतेला पुरेपूर न्याय द्यावा लागणार आहे.