Murder : खून करून केला अपघाताचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल

Murder : अपघाताचा बनाव करून केला खून; स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल

0
Murder : अपघाताचा बनाव करून केला खून; स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल
Murder : अपघाताचा बनाव करून केला खून; स्थानिक गुन्हे शाखेने केली उकल

Murder : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव शिवारात पिकअपच्या धडकेत तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Ahilyanagar Taluka Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली होती. मात्र, फिर्यादीने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर घटनेचा पुन्हा तपास केला असता, हा अपघात (Accident) नसून पूर्वनियोजित खून (Murder) केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा: ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ हे पत्रक बनावट!; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

देऊळगाव सिद्धी शिवारात ता. १९ जानेवारी २०२६ रोजी साखर कारखान्याजवळ संदीप ताराचंद लगड (वय ३२, रा. तांदळी वडगाव, ता. अहिल्यानगर) यांचा पिकअपच्या धडकेत मृत्यू झाला. सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नातेवाईकांनी मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगूनही पोलिसांनी रामदास ताराचंद लगड यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश बाळासाहेब घिगे व राजेंद्र रमेश घोंगडे (दोघे रा. वडगाव तांदळी) यांच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला व अटकही केली.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

अपघात नसून घातपात असल्याचा संशय (Murder)

मात्र, फिर्यादी रामदास लगड व त्यांच्या नातेवाईकांचा संशय होता की हा अपघात नसून हा घातपात आहे असा संशय व्यक्त करत तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गीते यांनी खुनाच्या अनुषंगाने तपास करण्यास अनास्था दाखविल्याचा आरोप करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करूनही दाद न मिळाल्याने अखेर फिर्यादीने अधीक्षक घार्गे यांच्याकडे तक्रार केली आणि तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी केली. अधीक्षक घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना चौकशीचे आदेश दिले.

या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या. १९ जानेवारी रोजी संदीप लगड, ऋषिकेश घिगे व राजेंद्र घोंगडे हे तिघे देऊळगाव सिध्दी ते वाकळी रस्त्यावरील एका हॉटेल येथे जेवणासाठी बसले होते. त्यांच्यात वाद झाल्यानंतर संदीप एकटाच पायी निघून गेला. त्यानंतर संगनमत करून दोघांनी पाठीमागून पिकअप त्याच्या अंगावर घातल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशीत हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले असून पुढील तपास सहायक निरीक्षक वारूळे करीत आहेत.