Child Protection Committee : पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय

Child Protection Committee : पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय

0
Child Protection Committee : पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय
Child Protection Committee : पारनेर शहरामध्ये बाल संरक्षण समित्या स्थापन करण्याचा निर्णय

Child Protection Committee : पारनेर : बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पारनेर नगरपंचायतीने (Parner Nagar Panchayat) एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्नेहालय संस्थेच्या (Snehalaya) ‘उडान’ प्रकल्पाच्या पुढाकारातून, पारनेरमधील सर्व १७ प्रभागात  प्रभाग बाल संरक्षण समिती’ (Child Protection Committee) स्थापन करण्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे.

नक्की वाचा : विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष वागणुकीबाबत खताळ यांनी वेधले लक्ष; कारवाईची मागणी

१७ प्रभागातील नगरसेवक उपस्थित

नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे व मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम, पत्रकार भगवान गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विनायक महाले यांच्यासह सर्व १७ प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम १०६ आणि महाराष्ट्र शासनाच्या २०१४ च्या परिपत्रकानुसार, प्रत्येक वॉर्डात बाल संरक्षण समिती असणे बंधनकारक आहे. पारनेर नगरपंचायतीने या कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवत, केवळ कागदोपत्री समित्या न ठेवता त्या सक्रिय करण्याचा निर्धार केला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स व्हॉट्सॲपवर मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D

सजग यंत्रणा असणे आवश्यक (Child Protection Committee)

आजच्या काळात बालविवाह, बालमजुरी, अमली पदार्थांचे सेवन, ऑनलाईन शोषण आणि लैंगिक अत्याचार यांसारख्या समस्या वाढत आहेत. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक पातळीवर सजग यंत्रणा असणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रत्येक प्रभागातील ही समिती ११ सदस्यांची असेल. यात नगरसेवक,(अध्यक्ष ) तर अंगणवाडी सेविका ( सदस्य सचिव) म्हणून काम पाहतील. महत्त्वाचे म्हणजे, बालकांचा आवाज ऐकला जावा यासाठी १२ ते १८ वयोगटातील एक मुलगा व एक मुलगी यांचाही यात समावेश असेल.

हा निर्णय राज्यासाठी आदर्श ठरेल

याशिवाय पोलीस अधिकारी, मुख्याध्यापक, डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या समितीत सक्रिय राहतील.ही समिती दरमहा बैठक घेऊन प्रभागातील जोखमीच्या मुलांची ओळख पटवेल. शाळाबाह्य मुले, बालविवाहाचा धोका असलेल्या मुली किंवा कौटुंबिक छळ सोसणारी मुले यांना तातडीने मदत मिळवून देणे, हे या समितीचे मुख्य कार्य असेल. “बालक सुरक्षित – प्रभाग सुरक्षित – शहर सुरक्षित” हा मंत्र घेऊन पारनेर आता अहिल्यानगर जिल्हा बाल अत्याचारमुक्त करण्याच्या मोहिमेत अग्रेसर राहील. स्नेहालय संस्थेचा ३६ वर्षांचा अनुभव आणि नगरपंचायतीची प्रशासकीय शक्ती यांच्या संगमातून पारनेरने घेतलेला हा निर्णय राज्यासाठी एक आदर्श ठरेल, असा विश्वास डॉ. विद्या कावरे यांनी व्यक्त केला.