Imprisoned in a cage | कोपरगाव तालुक्यात मादी बिबट्या व बछडा पिंजऱ्यात जेरबंद

परिसरात आणखी एक बछडा असल्याची शक्यता

0


Imprisoned in a cage : कोपरगाव: तालुक्यात विविध गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम असताना धारणगाव शिवारात आज मादी बिबट्या व तिचा एक बछडा वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला (Imprisoned in a cage). या कारवाईमुळे नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला असला तरी आणखी एक बछडा परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती समोर आल्याने चिंतेचे वातावरण अद्याप कायम आहे. ही घटना धारणगाव शिवारातील विजय कोंडाजी टिळेकर यांच्या चिकूच्या शेतात घडली. स्थानिक नागरिक व धारणगावचे सरपंच दीपक चौधरी यांच्या मागणीनुसार वनविभागाने २ फेब्रुवारी २०२६ पासून संबंधित ठिकाणी पिंजरा लावला होता. अखेर आज ३ मार्च रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्या व तिचा एक बछडा पिंजऱ्यात अडकला.

अवश्य वाचा- महिन्याभरात उद्यान विभागाच्या कामगिरीत बदल दिसला पाहिजे; ज्योती गाडे यांचा अल्टीमेटम

परिसरात आणखी एक बछडा असल्याची शक्यता (Imprisoned in a cage)

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मादी बिबट्याचा आणखी एक बछडा परिसरात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ दुसरा पिंजरा लावून शोधमोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. पकडण्यात आलेल्या बिबट्यांना सुरक्षितपणे राहुरी येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली. वनविभागाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाऊ नये, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.