Crime : नगर : जामखेड (Jamkhed) शहरातील नुरानी कॉलनी रस्ता परिसरात गोळीबाराची (Shootout) थरारक घटना घडली असून गावगुंड सागर मोहळकर याच्यावर अज्ञातांनी जवळून गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे (Crime) शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल टंचाई भासणार नाही
दुचाकीस्वारांनी केला हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सागर मोहळकर याच्यावर जवळून ३ ते ४ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोहळकर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीसांकडून तपास सुरू आहे. सागर मोहळकर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापूर्वी जामखेड पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते, अशी माहिती समोर येत आहे. शहरात व तालुक्यात त्याच्या त्रासदायक कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास कोणीही पुढे येत नसल्याचेही बोलले जात आहे.
हे पहा : शेकडो वर्षापासूनची डसन डुक्कराची प्रथा आजही कायम
कोण आहे सागर मोहळकर? (Crime)
सागर मोहळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत आहे. गेल्या वर्षी (११ एप्रिल २०२५) धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत त्याने पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला कानशिलात मारहाण केली होती. त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सागर मोहळकर याच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असून, तुरुंगातही त्याने एका व्यक्तीचा खून केल्याची माहिती आहे. तो कुस्तीच्या फडासोबत गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, जुना वैयक्तिक वाद किंवा गँगवारचा हा प्रकार असू शकतो. हल्लेखोर अद्याप फरार असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने जामखेडसह परिसरातील खळबळ उडाली आहे.



