Amol Khatal : संगमनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत संगमनेर (Sangamaner) तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी काढले.
नक्की वाचा : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर; लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

दोघांनी मिळवलेले यश तालुक्यासाठी अभिमानास्पद
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड हिने केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत देशात 106 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे तिची जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर ऋतुजाने मिळवलेले हे यश तालुक्यासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.तर जोर्वे येथील धनंजय संजय दिघे यांनी देखील केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक 529 मिळवत यश मिळवले आहे. या यशामुळे त्यांची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) पदासाठी निवड झाली आहे. अत्यंत स्पर्धात्मक आणि कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
तालुक्यात आनंदाचे वातावरण (Amol Khatal)
दरम्यान, या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आमदार खताळ यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋतुजा गायकवाड आणि धनंजय दिघे यांच्या यशामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



