ESMA Law : गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारकडून देशभरात एस्मा कायदा लागू

ESMA Law : गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारकडून देशभरात एस्मा कायदा लागू

0
ESMA Law : गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारकडून देशभरात एस्मा कायदा लागू
ESMA Law : गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारकडून देशभरात एस्मा कायदा लागू

ESMA Law : नगर : गॅसचा तुटवडा (Gas Shortage) जाणवू लागल्याने केंद्र सरकारने (Central Government) देशभरात एस्मा कायदा (ESMA Law) अर्थात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे.

अवश्य वाचा : मढी येथे नाथभक्तांचा जनसागर; लाखो भाविकांनी घेतले संजीवन समाधीचे दर्शन

युद्धामुळे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प

गेल्या 11 दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्याने येथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस युद्ध सुरु राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरुप धारण करु शकते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने केंद्र सरकारने देशभरात एस्मा (ESMA Law) अर्थात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी केली आहे. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. आखात देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

पेट्रोकेमिकल कंपन्यांना जास्त उत्पादनाचे निर्देश (ESMA Law)

आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे जगभरात इंधन टंचाईचे संकट जाणवू लागले आहे. भारतात व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेकांनी एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने देशभरात एस्मा कायदा लागू केला आहे. जेणेकरुन घरगुती LPG अर्थात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल. तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना जास्त प्रमाणात एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

ESMA कायदा म्हणजे नेमकं काय? (ESMA Law)

आपत्कालीन काळात अत्यावश्यक सेवा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यासाठी ESMA कायदा भारतीय संसदेने 1968 साली मंजूर केला होता.
दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो.
संपाच्या काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो.
त्यामुळे बंद आणि कर्फ्यूच्या काळातही कर्मचाऱ्यांना काम करण्यास नकार देता येत नाही.

ESMA कायद्याच्या कक्षेत ‘या’ सेवांचा होतो समावेश (ESMA Law)

सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जल पुरवठा, रुग्णालये आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा एस्मा कायद्याच्या कक्षेत येतात.
पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खनिज उत्पादन आणि वितरणाशी निगडीत असलेल्या संस्था आणि कंपन्या या कायद्याच्या कक्षेत येतात.
याशिवाय, बँकिग सेवाही एस्माच्या कार्यकक्षेत येते.
सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि खाद्यपुरवठा खरेदी आणि वितरण संबंधित सरकारी संस्थांना एस्मा कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते.