
Ekvira Sports Festival : संगमनेर : ग्रामीण भागातील महिला सहसा चूल आणि मूल व शेती यामध्ये रमलेल्या असतात. या महिलांना आरोग्य,आहार आणि व्यायामाचे महत्त्व सांगण्याबरोबर माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या क्रीडा (Sports) गुणांना व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या (Ekvira Foundation) वतीने महिला क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते.
नक्की वाचा : कोळगाव फाटा येथे ट्रक-टँकरचा भीषण अपघात; जीवित हानी टळली

चार वर्षापासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन
या महोत्सवात क्रिकेटसाठी 160 संघ, रस्सीखेच स्पर्धेसाठी 252 संघ तर बॅडमिंटनसाठी 327 महिला संघांचा सहभाग झाल्याने या स्पर्धा अत्यंत रोमांचकारी वळणावर पोहोचल्या आहे. शेतीमातीत राहणाऱ्या महिलांची क्रिकेट मैदानावर बॅट घेऊन होणारी फटकेबाजी पाहण्यासाठी हजारो महिला प्रेक्षकांची उपस्थिती लावत आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षापासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत आहे. यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे दोन दिवस स्पर्धा वाढवण्यात आल्या आहे. यामध्ये क्रिकेटसाठी 160 महिला संघांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 2400 महिला खेळणार आहे तर रस्सीखेचसाठी 252 महिला संघांचा सहभाग आहे.
अवश्य वाचा : कोठला परिसरात गोळीबार करणारे दोघे जेरबंद बंद

5674 महिला खेळाडू प्रत्यक्ष मैदानात (Ekvira Sports Festival)
यामध्ये 2520 तर बॅडमिंटन स्पर्धेसाठी 327 संघांची नोंद झाली आहे. यामधून 754 अशा एकूण 5674 महिला खेळाडू प्रत्यक्ष मैदानात खेळण्यासाठी उतरत आहेत. क्रिकेटच्या मैदानावर महिला बॅट हातात घेऊन जोरदार फटकेबाजी करत आहेत. षटकारा चौकारांची होणारी आतषबाजी आणि गोलंदाजाने फलंदाज बाद केल्यानंतर महिलांकडून होणारा जल्लोष आणि आनंदोत्सव हा अत्यंत आनंददायी आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला सबलीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. महिलांचे आरोग्य व आहाराबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. एकविरा क्रीडा महोत्सवामुळे संगमनेर तालुक्यातील महिलांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला एकत्र येत आहेत त्यामुळे एकमेकींच्या ओळखी होऊन मैत्री वाढत आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
पाच दिवसा ऐवजी आता सात दिवसांची स्पर्धा
वर्षातून होणाऱ्या भेटीगाठी, आत्मविश्वासाने खेळाचा आनंद, आणि तणाव मुक्त वातावरणात महिला अत्यंत आनंददायी दिसत आहेत. हजारो महिलांचे सामने पाहण्यासाठी असणारी उपस्थिती आयोजकांकडून केलेले अचूक नियोजन, प्रेक्षक गॅलरी, हिरवळीवर महिलांसाठी खेळण्याची संधी, आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसन्न वातावरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले आहे. दिवसेंदिवस महिलांच्या वाढत्या सहभागामुळे पाच दिवसा ऐवजी स्पर्धा आता सात दिवसांची करण्यात आली आहे.


