Iran US Israel War : नगर : अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे (Iran US Israel War) जगात तेल संकट निर्माण झाले आहे. असे असतानाही भारताने बांगलादेशला (India-Bangladesh) 5,000 टन डिझेल (Diesel) पाठवले आहे. पाईपलाईनद्वारे हा पुरवठा करण्यात आला. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य मजबूत करण्यासाठी हा द्विपक्षीय करार करण्यात आला.
नक्की वाचा : बारडगावचा तरुण बनला आयआरएस अधिकारी; दुसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा केली उत्तीर्ण
भारताने बांगलादेशला डिझेल पुरवठा का केला?
भारत आणि बांगलादेशमधील पाइपलाइन कराराअंतर्गत डिझेलचा पुरवठा सुरू झाला आहे. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य मजबूत करण्यासाठी हा द्विपक्षीय करार करण्यात आला. 5,000 टन डिझेलची पहिली खेप बांगलादेशात पोहोचली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी) चे अध्यक्ष मोहम्मद रेझानुर रहमान यांनी भारताकडून डिझेल पुरवठा झाल्याची पुष्टी केली आहे. आमचा भारतासोबत करार आहे. त्या करारानुसार, भारत दरवर्षी बांगलादेशला पाइपलाइनद्वारे 180,000 टन डिझेल पुरवेल असे त्यांनी सांगितले.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ नीतीचा भाग (Iran US Israel War)
भारतातून पाइपलाइन मार्गाने होणारा डिझेल पुरवठा बांग्लादेशसाठी खूप फायदेशीर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे. यामुळे फक्त वाहतुकीचाच खर्च कमी होणार नाहीय, तर बांग्लादेशच्या उत्तरेला डीझेल सहज उपलब्ध होईल. हा पाइपलाइन प्रकल्प भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ नीतीचा महत्वाचा भाग आहे. भारत आपल्या शेजारी देशाच्या मुलभूत गरजा आणि विकास कार्यासाठी सक्रीय मदत देत असल्याचं या नितीमधून दिसून येतं. मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगभरात तेल संकटाचा धोका निर्माण झालेलं असताना भारताने हे पाऊल उचललय.



