Fraud : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ५०० कोटीचा गंडा; संबंधितांना अटक करण्याची मागणी

Fraud : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ५०० कोटीचा गंडा; संबंधितांना अटक करण्याची मागणी

0
Fraud : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ५०० कोटीचा गंडा; संबंधितांना अटक करण्याची मागणी
Fraud : संगमनेरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली ५०० कोटीचा गंडा; संबंधितांना अटक करण्याची मागणी

Fraud : संगमनेर : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करून दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून संगमनेर आणि परिसरातील सुमारे २५० गुंतवणूकदारांची ५०० कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रा. लि.’ व ‘प्रथम धन वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांच्या माध्यमातून हा मोठा आर्थिक घोटाळा (Financial Scam) करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मगणी, ठेवीदारांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नक्की वाचा : कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाने केलं मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न

गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 2025 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यातील आरोपी फरार असून त्यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. मे २०२५ पासून संबंधित दोन्ही कंपन्यांचे मालक कार्यालयाला टाळे लावून फरार झाले आहेत. त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. अनेक गुंतवणूकदारांनी बँकांकडून मोठी कर्जे काढून ही गुंतवणूक केली होती. आता परतावा तर दूरच, पण मुद्दलही मिळत नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानसिक तणावाखाली असलेल्या काही गुंतवणूकदारांनी आत्महत्येचा इशाराही दिला आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष (Fraud)

संगमनेर शहरानजीक असलेल्या घुलेवाडी येथील जिजामाता प्राईड येथे कार्यालय थाटून महेश विश्वास मोरे आणि वैभव विठ्ठल काकड यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. आमच्या कंपनीत पैसे गुंतवा, आम्ही तुम्हाला दरमहा १० टक्के परतावा देऊ, असे प्रलोभन त्यांनी दिले. विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूकदारांना लेखी ॲफीडेव्हिट आणि सुरक्षेसाठी एक वर्षाच्या पुढील तारखेचे धनादेश देखील देण्यात आले होते. या फसवणुकीत महेश मोरे आणि वैभव काकड यांना राहुल शिंदे (आश्वी बु. ता. संगमनेर), विजय तबाजी काळे (मालदाड रोड, संगमनेर), जीवन गांजवे आणि गणेश वाळुंज या मध्यस्थांनी मदत केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.ग्राहकांनी आपली कष्टाची पुंजी, तर काहींनी बँकेकडून कर्ज काढून आरटीजीएस, एनईएफटी आणि रोख स्वरूपात महेश मोरे यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. या प्रकरणात पोलीस प्रशासन संबंधित संशयितांना कधी अटक करणार आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये परत मिळणार का? याकडे संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे