
Attempted Murder : नगर : सावेडी उपनगरात दोन अनोळखी व्यक्तींनी महिला वकिलाला (Female Lawyer) अडवून मारहाण (Assault) केली. ओढणीने गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder) केला. तसेच कात्रीने त्यांचे केस कापून गळा कापण्याची धमकी दिली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
जखमी ॲड. ऋषाली गोरक्षनाथ तांदळे (वय ४१, रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्तींसह विवेक घोडके, सोनिया घोडके (रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempted Murder)
सदरची घटना बुधवारी (ता. ११) घडली आहे. फिर्यादी आपल्या मुलाला आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना शाळेजवळ दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले व मारहाण केली. शेजाऱ्यांविरोधातील न्यायालयीन खटला मागे घे, अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत संशयित आरोपींनी ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कात्रीने फिर्यादीचे केस कापले व पुढच्या वेळी तुझा गळा कापू अशी धमकी देऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करीत आहेत.


