Seven Cattle Confined for Slaughter Rescued : मुकुंदनगर येथे कत्तलीसाठी डांबुन ठेवलेले सात गोवंशीय जनावरांची सुटका; दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Seven Cattle Confined for Slaughter Rescued : मुकुंदनगर येथे कत्तलीसाठी डांबुन ठेवलेले सात गोवंशीय जनावरांची सुटका; दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

Seven Cattle Confined for Slaughter Rescued : नगर : अहिल्या नगर शहरातील मुकुंद नगर (Mukund Nagar) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या सात गोवंश जनावरांची सुटका (Seven Cattle Confined for Slaughter Rescued) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सालीम समीर कुरेशी, इरफान कुरेशी (दोघे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर)(पसार), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

कत्तल करण्याचे उद्देशाने शेडमध्ये ठेवले डांबुन

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुकुंदनगर परीसरात इसरत पार्क शेजारी घोड्याचा तबेला शेजारी पत्र्याचे शेडमध्ये सलीम समिर कुरेशी व इरफान कुरेशी दोघे रा. झेंडीगेट अहिल्यानगर) यांनी गोवंशीय जनावरे खरेदी करुन आणुन जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने निर्दयतने शेडमध्ये डांबुन ठेवले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार अहमद इनामदार यांना कारवाई करिता बोलावुन खात्री केली असता तबेला शेजारी पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे हे दाटीवाटीने विना चारा पाणी असे शेडमध्ये बांधलेले दिसुन आले.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

१० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Seven Cattle Confined for Slaughter Rescued)

या ठिकाणावरुन ७० हजार रुपये किमतीचे ७ जिवंत गोवंशीय जनावरे, असा एकुण १० लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, गणेश धोत्रे, दीपक घाटकर, लक्ष्मण खोकले, शाहिद शेख, अतुल लोटके, भिमराज खर्से, सागर ससाणे यांच्या पाथकाने केली.