Help: अकोले: तालुक्यातील कौठवाडी येथील उंच डोंगरावरील धोंडीबा लक्ष्मण गंभीरे यांचे घर जळाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. याची दखल घेत संगमनेरच्या आधार फाउंडेशनने एक महिना पुरेल इतका किराणा, दोन धान्य कट्टे, घरगुती वापराची सर्व भांडीकुंडी, दोन सतरंजी, नवीन कपडे, दोन ब्लॅंकेट आदी महत्त्वाचे संसारोपयोगी साहित्य (Household goods) पोहच करत मोलाची मदत (Help) केली. या घटनेबाबत आधारचे शिलेदार दीपक बोऱ्हाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आधार फाउंडेशनला माहिती दिली. त्यावरून मदतीसाठी आधारने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
अवश्य वाचा- गावठी कट्ट्याचा धाक दाखवून खुनाचा कट रचणारा आरोपी जेरबंद
मदतीमुळे कुटुंबांना दिलासा (Help)
आधारचे शिलेदार संजय तळपाडे, रावसाहेब पावसे, रामदास सोनवणे, संतोष भुजबळ, रमेश नेवासकर, विजया मिसाळ यांनी आर्थिक स्वरूपात आधारला मदत केली. आधार फाउंडेशनने मानवतेच्या दृष्टीने केलेल्या मदतीमुळे या कुटुंबांना दिलासा मिळाला असल्याचे मत दीपक बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले. तर गरजू समाज बांधवांना मदत करणे आपले कर्तव्यच आहे असे माजी सरपंच सुरेश भांगरे व राजू धादवड म्हणाले. एक महिना पुरेल इतका किराणा, दोन धान्य कट्टे, घरगुती वापराची सर्व भांडीकुंडी, दोन सतरंजी, नवीन कपडे, दोन ब्लॅंकेट आदी महत्त्वाचे संसारोपयोगी साहित्य ही सर्व मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी विठ्ठल कडूसकर, सोमनाथ मदने, डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे, बाळासाहेब पिंगळे, पी. डी. सोनवणे, अनिल कडलग, विनोद राऊत, ऋषिकेश शिंदे, राहुल राऊत, सुनील आरोटे,बाळू भांगरे, निलेश तळेकर, राजू चांदवड, रावजी गंभीरे, देविदास भाईक, दिनकर गभाले, रमेश नेवासकर, तुषार शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.



