Shrirampur City Police Station : श्रीरामपूर : शहर पोलीस ठाण्याच्या (Shrirampur City Police Station) हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून गहाळ झालेले किंवा चोरी झालेले २७ मोबाईल (Mobile) शहर पोलीस ठाण्याकडून त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर (Jayadatta Bhavar) व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या हस्ते परत देण्यात आले.
नक्की वाचा : निसर्गाशी मैत्री करा आणि आनंदी रहा: पद्मश्री राहीबाई पोपेरे
खबरदारी घेण्याचे आवाहन
दरम्यान या २७ मोबाईल मध्ये अनेक महागडे मोबाईल आहेत. नागरिकांनी मोबाईल हाताळताना काळजी घ्यावी, जबाबदारीने मोबाईल हाताळावा. मोबाईल चोरी वा गहाळ झाल्यास आरोपी त्याचा गुन्हा करण्यासाठी गैरवापर करतो. त्यामुळे ही खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांनी कारवाई केली (Shrirampur City Police Station)
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, रविंद्र शिंदे, सागर बनसोडे, अमोल गायकवाड यांनी केली आहे.



