Akshay Kardile : राहुरी तालुक्याला गारपीटीने झोडपले; सरसकट पंचनामे करण्याची अक्षय कर्डिले यांची मागणी

Akshay Kardile : राहुरी तालुक्याला गारपीटीने झोडपले; सरसकट पंचनामे करण्याची अक्षय कर्डिले यांची मागणी

0

Akshay Kardile : राहुरी : तालुक्यातील गडकवाडी, म्हैसगाव पंचक्रोशीतील गावांमध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने (Hailstorm) राहुरी तालुक्यातील काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभा हंगाम (Season) उद्ध्वस्त झाला. या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांनी थेट शेतात उतरून नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. 

नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Akshay Kardile : राहुरी तालुक्याला गारपीटीने झोडपले; सरसकट पंचनामे करण्याची अक्षय कर्डिले यांची मागणी
Akshay Kardile : राहुरी तालुक्याला गारपीटीने झोडपले; सरसकट पंचनामे करण्याची अक्षय कर्डिले यांची मागणी

मदतीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

यावेळी, शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तत्काळ मदतीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी कर्डिले यांनी तहसीलदारांकडे केली. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गारांच्या तडाख्यामुळे कांदा, गहू, मका, ऊस आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढून ठेवलेला माल भिजून गेला, तर उभ्या पिकांचे अस्तित्वच संपले. या संकटात शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असताना अक्षय कर्डिले यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण (Akshay Kardile)

कर्डिले पुढे म्हणाले की, पंचनाम्यात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे व मदतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी अधिाऱ्यांकडे केली. अक्षय कर्डिले यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गारपीटीच्या या भीषण संकटात कर्डिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र सध्या राहुरी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

कर्डिले यांनी सांगितले की

अक्षय कर्डिले यांनी सांगितले की, त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा केली. यावेळी विखे पाटील यांनी तत्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा व आवश्यक ती मदत करावी, असे आदेश दिल्याची माहिती कर्डिले यांनी दिली.