
Sharad Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये (Baramati)विधानसभेची पोटनिवडणुक (Assembly By-election) होणार आहे. ही निवडणूक २३ एप्रिलला पार पडेल. रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार उभ्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar)यांनी काँग्रेसला सल्ला दिला. मात्र त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा: भोंदू अशोक खरातने सख्ख्या नातलगांनाही फसवलं;परिवहन अधिकाऱ्यांच्या नावेही फसवणूक
शरद पवार नेमकं काय म्हणाले? (Sharad Pawar)
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करणं हे योग्य राहिल. मी काँग्रेसला इतकाच सल्ला देईन. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसचा निर्णय आहे. आम्ही काही त्यांना फार सांगू शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे, असं म्हटलं होतं. मात्र आज माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी काँग्रेसला निवडणूक अविरोध करण्याचा सल्ला दिला आहे.
अवश्य वाचा: ‘मागासवर्गीय समुदायाचे सदस्य असणे हा सरकारी नोकरीत सवलत मिळवण्याचा आधार नाही’- सर्वोच्च न्यायालय
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? (Sharad Pawar)
काँग्रेस माघार घेणार की नाही? याबाबत मला काही बोलता येणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मीडियाकडून माहिती घेऊन या प्रकरणी सर्वात जास्त पाठपुरावा कुणी केला असेल तर तो रोहित पवार यांनी केला आहे. तसंच संसदेत हा प्रश्न सातत्याने मांडण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलं आहे. रोहित पवारांनी जो पाठपुरावा केला, त्या सगळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं. मात्र या प्रकरणाचा म्हणावा तसा पाठपुरावा झालेला नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंं आहे.


