Accident : पाथर्डी : तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात (Karanji Ghat) गुरुवारी भीषण अपघात (Accident) घडला. पुणे येथून लोखंडी पाईप घेऊन जालना येथे निघालेल्या ट्रकचे ब्रेक फेल (Brake Failure) झाल्याने ट्रक घाटात पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
नक्की वाचा: ‘बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सल्ला मी काँग्रेसला देईन,पण…’; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

लोखंडी पाईप रस्त्यावर विखुरले
मिळालेल्या माहितीनुसार, करंजी घाटातून जात असताना ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाले. ही बाब लक्षात येताच चालक दत्ता बांगर यांनी प्रसंगावधान राखत ट्रक डोंगराच्या बाजूला दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र वेग जास्त असल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील लोखंडी पाईप रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विखुरले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वाहनांच्या लांबच लांब रांगा (Accident)
या घटनेमुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्यावर पडलेल्या लोखंडी पाईपमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे एक ते दीड तासानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाईप बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात
दरम्यान, या अपघातात चालक दत्ता बांगर यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली. करंजी घाट हा अपघातप्रवण ठिकाण बनत चालला असून वळणदार रस्ते आणि चढ-उतारामुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत. प्रशासनाने या ठिकाणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच चालकांनीही घाटातून प्रवास करताना वाहनांची तांत्रिक तपासणी करूनच प्रवास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे



