
Parner Market Committee : पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parner Market Committee) सभापती आणि उपसभापती निवडीचा पेच अखेर सुटला असून, सभापतीपदी अनुभवी नेते गंगाराम बेलकर तर उपसभापतीपदी संदीप सालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. किसनराव रासकर यांनी सभापतीपदाचा आणि किसनराव सुपेकर यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही रिक्त झालेली पदे भरण्यासाठी निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास जाधव यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नक्की वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; सात उमेदवारांत लढत
बेलकर यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंगाराम बेलकर यांना बाजार समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. बेलकर हे तालुक्याचे ज्येष्ठ नेते असून त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे, तसेच त्यांच्या पत्नी अरुणा बेलकर यांनीही पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. दुसरीकडे, उपसभापतीपदी वर्णी लागलेले संदीप सालके हे निलेश लंके प्रतिष्ठानचे अतिशय जुने आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. एका निष्ठावान युवा कार्यकर्त्याला संधी देऊन खासदार निलेश लंके यांनी तरुणांवर मोठा विश्वास टाकला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
लंके यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक (Parner Market Committee)
या निवडीपूर्वी खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लंके यांनी बेलकर आणि सालके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि त्यानुसार ही निवड बिनविरोध झाली. साधारण तीन वर्षांपूर्वी खासदार लंके यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीवर सत्तांतर झाले होते. सत्तेच्या सुरुवातीला बाबासाहेब तरटे आणि बापू शिर्के यांना संधी मिळाली होती, त्यानंतर किसन रासकर आणि किसन सुपेकर यांनी कार्यभार सांभाळला. आता तिसऱ्या टप्प्यात बेलकर आणि सालके यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.
गुलालाची उधळण करत जल्लोष
निवडीची घोषणा होताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर डॉ. बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगीराज गाडे, रा. या. औटी, अशोक कटारिया, पद्मजा पठारे, छाया रोकडे, बाबासाहेब नर्हे, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के, चंदन भळगट, अशोक कटारिया, विजय पवार, आबासाहेब खोडदे, सरपंच प्रकाश गाजरे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, जितेश सरडे, सचिन पठारे, रवींद्र राजदेव, शहराध्यक्ष संदीप मते, रायभान औटी, शिवाजी बेलकर, उद्योजक संतोष गायखे, बाळासाहेब खिलारी, श्रीरंग रोकडे, रवींद्र गायखे, तुकाराम चव्हाण, संदीप चौधरी, भूषण शेलार, बाळासाहेब दिघे, पंकज बेलकर, चैतन्य बेलकर, ऍड. गणेश कावरे, लखन ठाणगे, गणेश गायखे, रामदास साळवे, प्रमोद गुगळे, शिवाजी भोसले, बाळासाहेब दाते, शांताराम बेलकर, अरुण बेलकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.


