London Book of World Record : नगर : ग्रामीण भागात आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुखद हेल्थ केअर सेंटरचे संचालक जयेश संपत खरमाळे (Jayesh Sampat Kharmale) यांना आंतरराष्ट्रीय (International) स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. नॅचुरोपॅथी, बोन सेटिंग आणि विविध आल्टरनेटिव्ह थेरपीज क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (London Book of World Record) नामांकन प्रदान करण्यात आले आहे. संपूर्णपणे नैसर्गिक उपचार पद्धतीच्या माध्यमातून अत्यंत अल्पकालावधीत म्हणजेच एक वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
४ एप्रिलला हा सन्मान अधिकृतपणे प्रदान
या सन्मानांतर्गत त्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक मंडळ यांच्या शिफारशीच्या आधारे हा सन्मान जाहीर केला. ग्रामीण भागात त्यांनी केलेली समाजोपयोगी सेवा, रुग्णांप्रती असलेली बांधिलकी आणि व्यावसायिक योगदान याची विशेष दखल घेण्यात आली. ४ एप्रिलला हा सन्मान अधिकृतपणे प्रदान करण्यात आला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव (London Book of World Record)
या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना जयेश खरमाळे म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. पुढील काळातही समाजसेवा आणि आरोग्य क्षेत्रात अधिक प्रभावी योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील. ”त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



