Mamata Pipada : राहाता : शिक्षण (Education) हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे शेतकरी, कामगार आणि वंचित घटकाच्या हक्कांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सातत्याने लढा दिला असे मनोगत माजी नगराध्यक्षा ममता पिपाडा (Mamata Pipada) यांनी बोलताना व्यक्त केले. त्या महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंती प्रसंगी बोलत होत्या. यावेळी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
नक्की वाचा : बेकायदेशीर गोवंशीय कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा फुले यांचे योगदान महत्त्वाचे
पिपाडा पुढे म्हणाल्या की, भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर संघर्ष केला. महात्मा फुले यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला. त्या काळात स्त्रीशिक्षणाला विरोध असतानाही त्यांनी धाडसाने पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्यात सावित्रीबाई फुले यांनीही मोठे योगदान दिले. फुले यांनी जातिव्यवस्था, अंधश्रद्धा आणि सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
समानता आणि बंधुता वाढवण्याचा प्रयत्न (Mamata Pipada)
“सत्यशोधक समाज” स्थापन करून त्यांनी समाजात समानता आणि बंधुता वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच “गुलामगिरी” सारख्या ग्रंथातून त्यांनी शोषण व्यवस्थेवर टीका केली. आजच्या काळातही महात्मा फुले यांचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. समाजातील विषमता दूर करण्यासाठी आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारांची गरज आहे. असेही ममता पिपाडा बोलताना म्हणाल्या. यावेळी, भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा, आरपीयाचे दिलीपराव वाघमारे, मदनलालजी पिपाडा, प्रगतशील शेतकरी शिवाजीराव आनप, महावीर पिपाडा, निखील पिपाडा, तिर्थम पिपाडा आदी उपस्थित होते.



