Excavation on New Roads : नवीन रस्त्यांवर गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदकाम; नागरिकांमध्ये संताप

Excavation on New Roads : नवीन रस्त्यांवर गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदकाम; नागरिकांमध्ये संताप

0
Excavation on New Roads : नवीन रस्त्यांवर गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदकाम; नागरिकांमध्ये संताप
Excavation on New Roads : नवीन रस्त्यांवर गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदकाम; नागरिकांमध्ये संताप

कारवाईची नागरिकांची मागणी; प्रशासनाने नियोजनबद्ध काम करण्याची गरज

Excavation on New Roads : नगर : शहरातून जाणाऱ्या मनमाड राज्य महामार्गाचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शहराला सुशोभीकरणाचे रूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.

नक्की वाचा : हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली

नव्या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या प्रयत्नातून या कामासाठी शासनाकडून मोठा निधी उपलब्ध झाला होता. मात्र, नव्याने तयार झालेल्या रस्त्यावर गॅस पाईपलाईन कंपनीकडून ठिकठिकाणी खोदकाम (Excavation on New Roads) करण्यात येत असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे नव्या रस्त्यांची पुन्हा दुरवस्था होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष उघड (Excavation on New Roads)

या संपूर्ण प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “शहरात प्रशासन आहे की नाही?” असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. नव्याने झालेल्या रस्त्यांवर अशा प्रकारे खोदकाम होणे ही गंभीर बाब असून, यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.


गॅस पाईपलाईन कंपनीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहरात सुरू असले रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामे भविष्यात गॅस पाईपलाईन कंपनीकडून खोदली जाऊ शकतात यासाठी. महापालिकेने नव्याने तयार झालेल्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच गॅस पाईपलाईनसारखी कामे नियोजनबद्ध पद्धतीने करून नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारे नव्या रस्त्यांवर पुन्हा पुन्हा खड्डे खोदले जाणार असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.