Right direction: शिक्षकांकडून समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे महान कार्य: बुगे

शिक्षकाचे ज्ञान कधीही संपत नाही, उलट ते सतत वाढतच जाते

0


Right direction:पाथर्डी: सामान्यतः ज्ञान आत्मसात करताना माणसाला काहीतरी परतफेड करावी लागते. मात्र, शिक्षक हा असा व्यक्ती आहे की, तो कोणतीही अपेक्षा न ठेवता अखंडपणे ज्ञानदान करत राहतो. बुद्धीला ज्ञान देण्याचे आणि समाजाला योग्य दिशा (Right direction) दाखवण्याचे महान कार्य शिक्षक करत असतो. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून तो नव्या पिढीचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी केले. जिल्हा परिषदचे शिक्षक आदिनाथ शेळके, बाबासाहेब शेळके, सुनंदा पालवे(गर्जे ), प्रकाश ढोले या चार शिक्षकांचा सेवापुर्ती गौरव (Glory for service) व निरोप समारंभ साकेगाव केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला, त्यावेळी बुगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

अवश्य वाचा-  सूरसम्राज्ञीचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची रीघ; ‘असा’ असणार अंत्ययात्रेचा मार्ग

शिक्षकाचे ज्ञान कधीही संपत नाही, उलट ते सतत वाढतच जाते (Right direction)

यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, नगरध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक संजय देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी कराड, निलेश क्षिरसागर, मच्छिंद्र गोरे, प्रा. संपत गर्जे, जगन्नाथ महाराज उबाळे, शिवाजी महाराज वारे, भगिनाथ बडे, कल्याण लवांडे, दिलीप बोरुडे, गहिनाथ शिरसाट, हुमायून आतार, कैलास दौंड, विजय अकोलकर आदी उपस्थित होते. बुगे म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तो सातत्याने प्रयत्नशील असतो. शिक्षकाचे ज्ञान कधीही संपत नाही, उलट ते सतत वाढतच जाते, त्यामुळे समाजात शिक्षकाला अत्यंत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. शिक्षक हा साधारण माणूस नसून तो राष्ट्राची निर्मिती करणारा घटक आहे. समाजाची भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर असून, त्यासाठी शिक्षक सदैव तत्परतेने कार्य करत असतात.

नक्की वाचा- रुपाली चाकणकरांची बहीण शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, खरात विषयी काय बोलणार?

पूर्वीच्या काळापासून समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची (Right direction)


अँड. प्रताप ढाकणे म्हणाले, फार पूर्वीच्या काळापासून समाज घडविण्याच्या प्रक्रियेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली असून आजही आणि भविष्यातही त्यांचे गुरुस्थान अढळ राहणार आहेआपण ज्या क्षेत्रात कार्य करतो ते काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करणे हीसुद्धा एक प्रकारची राष्ट्रसेवा आहे. शिक्षक हे आपल्या ज्ञानदानाच्या माध्यमातून नवी पिढी घडवत असतात. त्यांच्या कार्यातून समाजात संस्कार, मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे शिक्षकांनी केलेले प्रामाणिक कार्य हे राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान ठरते.
अभय आव्हाड म्हणाले, शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांच्या कार्यामुळेच राष्ट्राची भक्कम पायाभरणी होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनातूनच सक्षम आणि जबाबदार नागरिक घडतात. त्यामुळे समाजात शिक्षकांचे स्थान सर्वोच्च असल्याचे त्यांनी नमूद केले.भाऊसाहेब गोरे,माणिक साखरे, स्वाती वारे, कृष्णा रेपाळ, वर्षा वाघ, बप्पासाहेब शेळके, सुखदेव दराडे, सुमन पालवे, नंदा नागरे, सीमंतिनी टेमकर, मंदा बडे, ज्ञानेश्वर अंदुरे, लक्ष्मण गर्जे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.प्रास्ताविक राजेंद्र गुंजाळ, सूत्रसंचालन महादेव कौसे यांनी करून आभार महादेव आव्हाड आदी उपस्थित होते.