Amol Khatal : प्रस्ताव येताच तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करा : खताळ

Amol Khatal : प्रस्ताव येताच तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करा : खताळ

0
Amol Khatal : प्रस्ताव येताच तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करा : खताळ
Amol Khatal : प्रस्ताव येताच तत्काळ पाण्याचे टँकर सुरू करा : खताळ

Amol Khatal : संगमनेर : टंचाईच्या काळात जनतेला पाणी (Water) देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे त्या भागाचा प्रस्ताव येताच तत्काळ पाण्याचे टँकर (Water Tankers) सुरू करा अशा सूचना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

पोलीस बंदोबस्त लावून ते अडथळे दूर करा

येथील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवार (ता. १३) आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीटंचाई आढावा बैठक झाली. तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असताना कोल्हेवाडी फाटा येथे काही जणांनी योजनेच्या कामात अडथळे निर्माण केले आहे .ते अडथळे दूर करून योजना लवकर सुरू करावी अशी मागणी तळेगाव गटातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली त्यावर बोलताना ते म्हणाले की, तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये कोणी अडथळे आणत असेल तर पोलीस बंदोबस्त लावून ते अडथळे दूर करा आणि या योजनेचे काम आठ ते दहा दिवसात पूर्ण करा अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रांतअधिकारी, पोलीस उपाधीक्षक व जलजीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जनता पाण्यावाचून त्रस्त (Amol Khatal)

घुलेवाडी गावातील जनता पाण्यावाचून त्रस्त आहे. तुम्हाला पाणी पुरवठ्याबाबतचे नियोजन करता आले नाही म्हणून महिला आणि नागरिकांना पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढावा लागला अशा शब्दात आमदार खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाण्याबाबत काय उपाययोजना केल्या ते सांगा असा प्रश्न विचाला. त्यावर पाणीपुरवठा करण्यासाठी मालपाणी उद्योग समूह इरिगेशन भागातील तळे व प्रवरानदी वरील विहीर अधिग्रहित केली असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी यांनी सांगितले त्यावर तुम्ही जास्त वेळ ग्रामपंचायत कार्यालयात न थांबता पाणीपुरवठा कुठल्या भागात झाला आहे किंवा नाही याची पाहणी करा आणि सर्वांना समप्रमाणात पाणी कसे वाटप करता येईल याचे नियोजन करा असेही आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना सांगितले.

विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित

 यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे, पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, महावितरणचे सहाय्यक अभियंता चंद्रशेखर खैरनार, ग्रामपाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पारधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, विनोद सूर्यवंशी, जनार्दन आहेर, गुलाब भोसले, कैलास कासार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.