Anganwadi Workers Recruitment : राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती 

0
Anganwadi Workers Recruitment : राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती 
Anganwadi Workers Recruitment : राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती 

नगर : महिला व बाल विकास विभागात (Department of Women and Child Development) तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली. विशेष म्हणजे ही लाखो पदांची भरती अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers Recruitment) आणि मदतनीस पदासाठी होणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही एक नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

नक्की वाचा: MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल ;५३ ऐवजी १५३ संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार

महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. २००३ नंतर म्हणजेच तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत. विभागाच्या कामकाजासाठी तब्बल २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी शरीरसुखाची मागणी ; नेमकं प्रकरण काय?

२.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार (Anganwadi Workers Recruitment)

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनावर आधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत. २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

‘गट ब’ साठी ५५२ पदांची भरती (Anganwadi Workers Recruitment)

MPSC ने गट ब (अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरामध्ये तब्बल ५५२ पदांसाठी भरती होणार आहे. या जाहिरामधील ५५२ जागांपैकी ASO साठी ६ जागा, STI साठी २३६ जागा तर PSI साठी ३१० जागा आहेत. १४ जूनला पूर्व परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षा पार पडले. ASO आणि STI साठी मुलाखत होणार नाही. मात्र, PSI साठी मुलाखत प्रक्रिया पार पडेल.