LCB : मोटारसायकल चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी सापळा रचून केले अटक

LCB : मोटारसायकल चोरी प्रकरणी सापळा रचून जप्त केली चार आरोपींना अटक

0
LCB : मोटारसायकल चोरी प्रकरणी सापळा रचून जप्त केली चार आरोपींना अटक
LCB : मोटारसायकल चोरी प्रकरणी सापळा रचून जप्त केली चार आरोपींना अटक

LCB : पाथर्डी : तालुक्यातील रेणुकाईवाडी येथून चोरीस (Motorcycle Theft) गेलेली होंडा कंपनीची सीबी शाईन मोटारसायकल श्रीरामपूर येथे पोलिसांनी (Shrirampur Police Station) सापळा रचून जप्त केली असून या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू

पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  दत्तात्रय भागवत म्हस्के (रा. रेणुकाईवाडी, ता. पाथर्डी) यांच्या मालकीची होंडा सीबी शाईन (क्र. एमएच १६ सीएल १३६५) ही मोटारसायकल दिनांक ८ मार्च २०२६ रोजी दुपारी किराणा दुकानासमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई (LCB)

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचण्यात आला. अशोकनगर ते मातापूर रोडवरील रेल्वे पुलाखाली पोलिसांनी सायंकाळी कारवाई करत दोन मोटारसायकलवरून येणाऱ्या  महेश मारुती कांदळकर (वय २४), अजय रेवजी कांदळकर (वय २२), जावेद समद बेग (वय १८) व पिकास बाळासाहेब जाधव (वय १९ सर्व रा.

अशोकनगर, ता. श्रीरामपूर) हे चार संशयितांना ताब्यात घेतले.

 त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलींची कागदपत्रे न सादर करता आल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गाड्या चोरी केल्याची कबुली दिली.यामध्ये पाथर्डी तालुक्यातील मिरी परिसरातून चोरीस गेलेली सीबी शाईन तसेच मढी गावातून चोरीस गेलेली प्लॅटीना मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोहेकॉ संभाजी कुसळकर, भगवान टकले, अभयसिंग लबडे पुढील तपास करीत आहे.पथकाने केली.सोमवारी आरोपींना पाथर्डी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.