नगर : नवीन अर्थी वर्ष सुरु होताच आयटीआर फॉर्म (ITR Filling 2026) कधीपासून भरता येणार असा प्रश्न अनेक करदात्यांना पडला आहे. अजूनही पोर्टलवर फॉर्म (ITR Form) दिसत नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पोर्टलवर फॉर्म सुरु झाल्यानंतर तुम्ही आयटीआर फाइल (ITR File) करु शकाल. मात्र तुम्हाला नेमका कधी तो फाईल करता येईल ते सविस्तर जाणून घेऊ…
नक्की वाचा: राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
आयटीआर फाइल करण्याबाबत आयकर विभागाने नियम अधिक कडक केले आहेत. आर्थिक वर्ष २६-२७ साठी आयकर विभागाने आयटीआर फॉर्म १ आणि ४ अधिसूचित केले आहे. आयकर विभागाच्या पोर्टलवर सध्या मागच्या वर्षाचे फॉर्म दिसत आहे. जोपर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म दिसत नाही तोपर्यंत तुम्ही आयटीआर फाइल करु शकणार नाही. लवकरच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन आयटीआर फॉर्म जारी केले जातील. यानंतरच तुम्ही फॉर्म भरु शकतात. दरम्यान, जर कोणी बनावट कागदपत्रांचा वापर करुन कर चुकवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल.
अवश्य वाचा: MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल ;५३ ऐवजी १५३ संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविली जाणार
…तर नोटीस येणार (ITR Filling 2026)
याआधी रिटर्न फाइल केल्यानंतर सर्व गोष्टी चेक केल्या जायच्या. आता आरोग्य विमा, पीपीएफ, एनपीएस किंवा घरभाडे या सवलतींसाठी कागदपत्रे अपलोड करताच लगेच पडताळणी केली जाते. माहितीमध्ये जर कोणतीही तफावत आढळली तर ते दुरुस्त करण्यास सांगितले जाते. अन्यथा नोटीस पाठवून दंड देखील आकारला जाणार आहे.
आयटीआर कधीपासून भरता येईल? (ITR Filling 2026)
तुम्ही एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीसाठी आयकर परतावा भरणे आवश्यक आहे. उत्पन्नावरील कर भरण्यासाठी आयकर विवरणपत्र दाखल करणे आवश्यक आहे. जोपर्यंत २०२६-२७ साठीचे आयटीआरचा पर्याय दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही कायदेशीररित्या रिटर्न फाइल करु शकत नाही. त्यामुळे आता करदात्यांना वाट पाहावी लागणार आहे. मागील वर्षी आयटीआर फॉर्म जारी करण्यासाठी उशिर झाला होता. त्यामुळे आयटीआर भरण्याची मुदत देखील सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. दरम्यान, या आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाइल करण्याची सुरुवात कधीपासून सुरु होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



