Gold Price Today : लग्नसराई सुरु होताच सोने आणि चांदी (Gold Price Today) खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून सोने -चांदीच्या दरातील घसरणीनंतर आज १४ एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिका-इराण संघर्षावरनंतर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरातही वाढ (Gold prices also increased) झाली आहे.
नक्की वाचा: आयटीआर कधीपासून फाइल करता येणार? नवीन अपडेट आली समोर
सोन्याचा दर काय?(Gold Price Today)
भारतात आज २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,४०८ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹ १४८ ने वाढला आहे. तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,१२५ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹१३५ ने वाढला आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,५६० असून, तो कालच्या दरापेक्षा ₹१११ ने वाढलेला दिसत आहे.
अवश्य वाचा: राज्यात २.२१ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार ; मंत्री आदिती तटकरेंची माहिती
२४-कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today)
भारतात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,४०८ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹१४८ ने वाढला आहे. दरम्यान, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५४,०८० असून, तो कालच्या दरापेक्षा ₹१,४८० ने वाढला आहे. तर २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४१,२५० असून, तो सोमवारच्या दरापेक्षा ₹१,३५० ने वाढला आहे.
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया सकाळच्या सत्रात बंद होते. परंतु, सायंकाळच्या सत्रात ५ ते ११:३० च्या दरम्यान पुन्हा व्यवहार सुरू होणार आहेत. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरातही वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज COMEX सोन्याचे दर ०.६५ टक्क्यांनी वाढून प्रति औंस सुमारे ४,८०० डॉलरवर व्यवहार करत होते, ज्यामुळे मागील दोन सत्रांमधील ०.६ टक्क्यांची घसरणीची बऱ्याच अंशी भरपाई झाली आहे.



