
Dr. Radhakrishna Vikhe Patil : राहाता : भारत वर्षामध्ये अनेक महापुरुषांनी देशासाठी (Nation) आपले जीवन समर्पित केले आहे त्या महापुरुषांमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr. Babasaheb Ambedkar) नाव अग्रेसर असून डॉ. आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व इतर सर्व कार्याला उजाळा देण्याचा हा आजचा दिवस असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.
नक्की वाचा : देवदैठण येथे बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाला वाचवण्यात यश तर वडिलांचा मृत्यू
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
राहाता येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने जयंती व समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी विखे पाटील बोलत होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ. विखे पाटील यांनी पूजन केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विखे पाटील म्हणाले की (Dr. Radhakrishna Vikhe Patil)
डॉ. विखे पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक वाटचाल करताना शोषितांच्या जीवनातील अंधार दूर करून समाजाला घडविण्याचे काम केले ज्ञान व शिक्षणाने माणूस समृद्ध होतो हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून दिला. ते सामाजिक क्रांतीचे जनक होते. त्यांचे विचार व कार्य राष्ट्रभक्तीने प्रेरित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नारीशक्ती वंदन कायदा देऊन महिलांचा सन्मान वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली समर्पित केली आहे.
नवरत्नांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान
डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हा सर्व ग्रंथापेक्षा सर्वात अधिक पवित्र ग्रंथ असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानने समाजातील चांगले काम करणाऱ्या नवरत्नांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान केल्याच्या बद्दल त्यांनी राजेंद्र निकाळे, प्रदीप बनसोडे व प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर, पंकज पिपाडा, सुनील सदाफळ , प्रा. बाळासाहेब गाडेकर, माधव बिडवे, बाळासाहेब गिधाड, हाजी बालम सय्यद, दत्तात्रय पिलगर यांना समाजभूषण पुरस्कार तसेच माजी सैनिक भानुदास गाडेकर यांना प्रेरणादायी पुरस्कार पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


