Fraud | नगर : स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पाच लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tophkhana Police Station) सोमवारी (ता.१३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नाजिश अजाउद्दीन ईनामदार (वय ३६, रा. कोठला बारा इमाम) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल (Fraud)
फारूक शेख (रा. भिकनवाडा, पाथर्डी), कपिल अग्रवाल, लव अग्रवाल, अंकुश अग्रवाल (रा. पाथर्डी), कपिल अग्रवाल याचा मेव्हणा विशाल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), राजेंद्र चवनापुरे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. व्यवसायाच्या निमित्ताने फिर्यादी ईनामदार यांची ओळख) शेख याच्याशी झाली होती. त्याच्यामार्फत इतर संशयितांशी परिचय झाला.
अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण
साठेखत तयार (Fraud)
फिर्यादीस अहिल्यानगरमध्ये फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे समजल्यावर, संबंधितांनी सावेडी येथील शौर्य रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट स्वस्त दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार १५ लाख रुपयांत सौदा ठरवण्यात आला. सुरूवातीला १० लाख रूपये रोख देण्याची अट घालण्यात आली. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी नोटरीसमोर साठेखत तयार करून फिर्यादीकडून त्यांच्या राहत्या घरी १० लाख रुपये रोख स्वरूपात घेण्यात आले.
हे पहा – आगडगावमध्ये भरते भुतांची जत्रा
उर्वरित पाच लाख रूपये फ्लॅट ताब्यात देताना देण्याचे ठरले होते. मात्र नंतर साठेखताऐवजी कर्ज व्यवहाराचा उल्लेख असल्याचे लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावरही कोणतीही अडचण येणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. वारंवार मागणी करूनही खरेदीखत नोंदणी करण्यात टाळाटाळ करण्यात आली. फिर्यादीने पैसे परत मागितले असता, पाच लाख रुपये धनादेशाव्दारे परत करण्यात आले. मात्र उर्वरित पाच लाख रुपये परत करण्यास नकार देण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे.



