The Farmer’s Humanity : शेतकऱ्याने केली माणुसकीची जपणूक; पाणीटंचाई काळात विहीर केली गावकऱ्यांसाठी खुली

The Farmer's Humanity : शेतकऱ्याने केली माणुसकीची जपणूक; पाणीटंचाई काळात विहीर केली गावकऱ्यांसाठी खुली

0
The Farmer's Humanity : शेतकऱ्याने केली माणुसकीची जपणूक; पाणीटंचाई काळात विहीर केली गावकऱ्यांसाठी खुली
The Farmer's Humanity : शेतकऱ्याने केली माणुसकीची जपणूक; पाणीटंचाई काळात विहीर केली गावकऱ्यांसाठी खुली

The Farmer’s Humanity : पाथर्डी : तालुक्यातील भालगाव येथे तीव्र पाणीटंचाईमुळे (Water Scarcity) ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना माजी सरपंच अंकुश कासुळे (Ankush Kasule) यांनी सामाजिक बांधिलकी जपत (The Farmer’s Humanity) आपली स्वतःची खासगी विहीर गावकऱ्यांसाठी खुली करून दिली आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नक्की वाचा : श्रीगोंद्यात गॅस एजन्सींचा मेसेज घोटाळा; डिलीवरी मिळण्यापूर्वीच डिलीवरी सक्सेसचा मेसेज

भालगावसह परिसरात दुष्काळी परिस्थिती

सध्या पावसाअभावी भालगावसह परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण काळात कासुळे यांनी पुढाकार घेत आपल्या विहिरीतील पाणी सर्वांसाठी उपलब्ध करून दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

ग्रामस्थांनी मानले कासुळे यांचे आभार (The Farmer’s Humanity)

या उपक्रमामुळे गावातील अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली असून ग्रामस्थांनी कासुळे यांचे आभार व्यक्त केले आहेत. समाजासाठी पुढे येत केलेले हे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.