Fake Recruitment : ६०० शिक्षकांची बनावट भरती; कोट्यवधींचा पगार परस्पर लाटला

Fake Recruitment : ६०० शिक्षकांची बनावट भरती; कोट्यवधींचा पगार परस्पर लाटला

0
Fake Recruitment : ६०० शिक्षकांची बनावट भरती; कोट्यवधींचा पगार परस्पर लाटला
Fake Recruitment : ६०० शिक्षकांची बनावट भरती; कोट्यवधींचा पगार परस्पर लाटला

Fake Recruitment : नगर : जळगाव जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे तपासात समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे उघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील शालार्थ घोटाळ्यात ४८ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना नाशिक एसआयटीतर्फे सुनावणीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. जळगावच्या माध्यमिक शिक्षण विभागातील आजी-माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल ४८ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा : आता मंत्रालयाला उच्च सुरक्षेचं कवच; मंत्रालयाभोवती असणार घातक एलिट गार्ड

यांची चौकशी होणार (Fake Recruitment)

याप्रकरणात ११ उपशिक्षणाधिकारी, ३ कक्षाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण ४८ जणांची चौकशी केली जाणार आहे. १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जळगावमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे प्रकरण उघड झालेले आहे. या तपासात माध्यमिक शिक्षण आजी-माजी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल ४८ जणांना एसआयटीतर्फे सुनावणीसाठी नोटीस बजाविण्यात आली आहे. विभागातील जिल्ह्यातील काही शाळांनी कोणतीही पडताळणी न करता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केल्याचे तपासात समोर आले होते.

नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये गॅस पाईपलाईनसाठी कंपनीचा नवा प्रस्ताव; महापालिकेच्या चर्चेत सुटेना तिढा

महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात (Fake Recruitment)

२०२५ मध्ये नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात येऊन दहा शाळांच्या मुख्याध्यापक व संस्थाचालकांची चौकशी करीत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. एसआयटी पथकाने तपासाची चक्रे फिरविली असता काही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या अनिमियता आढळून आल्याने त्यांना तीन दिवस सुनावणीसाठी बोलविले आहे. काळात चार दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुनावणी. सबनावट कागदपत्रांच्या आधारे ६०० हून अधिक शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून कोट्यवधींचा पगार लाटल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील ४८ अधिकाऱ्यांची चौकशी निश्चित करण्यात आली असून, त्यांना १५ ते १८ एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडळात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.