नगर : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर ‘कैसा हराया’ असं म्हणणाऱ्या सहर शेखच्या (Sahar Shaikh) या डायलॉगची राज्यभर चर्चा रंगली होती. आता याच सहर शेख कडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल (Misleading government agencies) झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम नगरसेविका (MIM Corporator) असणाऱ्या सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला (Fake Caste Certificate) मिळविल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून हे जात प्रमाणपत्र घेतले.
नक्की वाचा: आता मंत्रालयाला उच्च सुरक्षेचं कवच; मंत्रालयाभोवती असणार घातक एलिट गार्ड
निवडणूक लढविताना चार महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याने सहर शेख यांच्या नगरसेवक पदावरआता टांगती तलवार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३०मधून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली होती.
नेमकं प्रकरण काय? (Sahar Shaikh)
सहर शेख यांनी बनावट कागदपत्राचे आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची एका तक्रारदाराची मागणी आहे. सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे.
अवश्य वाचा: स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अधिकाऱ्यांची दिशाभूल करून मिळविला बनावट दाखला (Sahar Shaikh)
उत्तर प्रदेशातील गाजियाबादची मूळ रहिवासी असलेल्या युनूस इक्बाल शेख या महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्या. इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना ८ वापरून, अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला त्यांनी मिळवला. त्यांचीच मुलगी असलेल्या सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी मिळविला.
ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दिकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. युनूस यांनी स्थलांतरितांना नमुना १० लागू असताना नमुना ८ वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला. त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्धीकी अहमद यांनी केली. ठाणे तहसीलदारांना मिळालेल्या तक्रारीनुसार,१८ मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीला आजाराचे कारण देत युनूस गैरहजर होते. सुनावणीला उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट व काही कागदपत्र सादर केले. २३ मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली. तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या. तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जात आहे.



